मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सर्वांसाठी केवळ सामना आणि मैदानापुरता उरत नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक मोठी बातमी येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानात भिडणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपसाठीचे ग्रूप आयसीसीने जाहीर केले आहेत. या ग्रूपमध्ये सुपर 12मध्ये भारत आणि पाकिस्तान संघाला एकाच ग्रूपमध्ये ठेवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने टी -20 वर्ल्ड कपच्या ग्रूपची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रूपमध्ये स्थान देण्यात आलं आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला दुसर्‍या गटात स्थान देण्यात आलं आहे. या स्पर्धेचे सामने 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान UAE आणि ओमान इथे होणार आहेत. एकूण 16 संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत.



टी 20 वर्ल्डकप सुपर 12मध्ये दोन गटांत कोणते संघ


ग्रूप 1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज, ए1, बी2


ग्रूप 2: भारत, पाकिस्तान, न्यूजीलैंड, अफगानिस्तान, बी1, ए2



क्वालिफायर स्टेजमध्ये 8 संघांची 2 ग्रृपमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. सुपर 12 मधील 2 ग्रृपमध्ये सध्या 8 संघांचाच समावेश आहे. क्वालिफायर  स्टेजमध्ये दोन्ही ग्रृपमधून प्रत्येकी 2 संघ सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्साठी प्रयत्न करतील. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल.


ग्रूप अ: श्रीलंका, आयरलंड, नीदरलंड, नामबिया


ग्रूप ब: बांग्लादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान


बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी पुरूष टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे ओमानला जागतिक क्रिकेटच्या कक्षेत आणणे चांगले. आयसीसी पुरूष टी -20 विश्वचषक 2021 चे स्थान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी मैदान. स्पर्धेचे वेळापत्रक निश्चितपणे जाहीर केलं जाणार आहे.