T20 World Cup 2022 IND vs PAK : टी 20 विश्वचषक 2022 साठी सुपर 12 मध्ये आधीच आपले स्थान निश्चित केलेल्या संघांमध्ये सध्या सराव सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तानचे (India VS Pakistan) संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघ सध्या त्याचीच तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. दरम्यान, ज्याची कोणालाच अपेक्षा नसेल असा एक मोठा धक्का पाकिस्तानी संघाला बसला आहे. आता पाकिस्तानी संघाला दुसरी संधी मिळणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने आपला पहिली प्रॅक्टिस सामना (Practice match) 17 ऑक्टोबर रोजी खेळला होता. भारताने 6 धावांनी हा सामना आपल्या नावावर केलाय. त्याचदिवशी पाकिस्तानचा इंग्लंडशी (England) सामना खेळला गेला होता. त्यावेळी पाकिस्तानला पराभवाचं तोंड पहावं लागलं. या सामन्यात कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) रेस्ट देण्यात आला होता. तर शाहिन शहा अफ्रिदी (Shaheen Shah Afridi) खूप दिवसांनी मैदानात उतरल्याचं पहायला मिळालं. त्यातही त्याने फक्त 2 ओव्हर टाकल्या. त्यामुळे पाकिस्तानचं T20 World Cup मध्ये काय होणार, असं सवाल आता उपस्थित होताना दिसतंय. 


दुसऱ्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू कमबॅक करतील , अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पाकिस्तानचा हा सामना पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानला आता प्रॅक्टिस मॅच खेळण्यासाठी दुसरी संधी मिळणार नाही. त्यामुळे आता कॅप्टन बाबर आझमचं टेन्शन वाढलंय.


आणखी वाचा- Roger binny बीसीसीआयचे नवे 'बॉस', पण खरी पॉवर कोणाकडे??


दरम्यान,  म्हणजेच 23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानची टीम मेलबर्नमध्ये (India VS Pakistan in T20 World Cup) उतरेल तेव्हा टीम इंडियाने आपली पूर्ण तयारी केली असेल, तर पाकिस्तानी टीम अर्धी अपूर्ण तयारी करून मैदानात उतरेल. याचा फायदा टीम इंडिया घेऊ शकतो. त्यामुळे आता भारत पुन्हा आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी टीमला हारवण्यात यशस्वी होऊ शकणार आहे. त्यासाठी रोहितसेना देखील कसून तयारी करताना दिसत आहे.