BCCI President: बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदावरुन सौरव गांगुलीची (Saurav Ganguly) गच्छंती झाल्यानंतर आता भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger binny) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (New BCCI President) नवे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक बैठकीत बिन्नी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता बीसीसीआयला नवा बॉस (BCCI New Boss) मिळाला, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, बीसीसीआयमध्ये खरी ताकद कोणाकडे असते? सचिव की अध्यक्ष?, असा सवाल सर्वांना पडलेला दिसत आहे.
सध्या बीसीसीआयच्या सचिवपदी जय शाह (Jay Shah), उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla), कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ (Arun Singh Dhumal) तर नवे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी (Roger binny) यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि सचिव यांचे अधिकार आणि कर्तव्य जाणून घेऊया...
बीसीसीआयचे अध्यक्ष सर्व बैठकांचे आणि सर्वोच्च परिषदेचे अध्यक्ष असतात. त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असते. बीसीसीआयच्या वार्षिक आर्थिक करारांवर, इतर सर्व अहवालांवर तीन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असतात, त्यापैकी एक अध्यक्षांची सही महत्त्वाची असते. त्याशिवाय कोणताही निर्णय होणं जवळजवळ अशक्य असतं.
बीसीसीआयची जनरल बॉडी आणि अॅपेक्स कॉन्सिल जी जबाबदारी देतील ती जबाबदारी बीसीसीआयचे अध्यक्ष यांच्याकडे असते. जर बोर्डाचं कोणतं पद रिक्त असेल किंवा कोणता अधिकारी अनुपस्थित असेल तर त्याची पुर्ण जबाबदारी बोर्ड अध्यक्षांची असते.
बीसीसीआयची वार्षिक बैठकांचं नियोजन, स्पेशल मिटींगचं नियोजन, एपेक्स काऊंसिलच्या मिटिंग्स या सर्व गोष्टींचं नियोजन बीसीसीआय सचिवांकडून केलं जातं. बीसीसीआयच्या वार्षिक आर्थिक करारांवर, इतर सर्व अहवालांवर तीन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असतात, त्यापैकी एक सचिवांची सही महत्त्वाची असते.
बीसीसीआय सचिव सर्व बैठका, रेकॉर्ड, कागदपत्रे आणि जनरल बॉडी, सर्वोच्च परिषदेच्या इतर मालमत्तांसाठी जबाबदार असतात.
अध्यक्षांच्या उपस्थितीत किंवा अनुपस्थितीत बीसीसीआयच्या सर्व बैठकांची जबाबदारी सचिवांच्या खांद्यावर असते. बीसीसीआयची सर्व विधानं किंवा निर्णय, अहवाल सर्व सदस्यांना पाठवण्याची जबाबदारी देखील सचिवांची असते. जॉईन्ड सेक्रेटरीचे सर्व अधिकार देखील सचिवांकडे असतात.
आणखी वाचा - Roger Binny: रॉजर बिन्नी यांना BCCI अध्यक्ष करण्यामागचं राजकारण काय?
सध्या बीसीसीआयचे सचिव जय शहा आहेत. तर संयुक्त सचिव म्हणून देवाजीत साइकिया जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच कोशाध्यक्ष म्हणून आशिष शेलार काम पाहतात. तसेच मागील अनेक वर्षापासून राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत.