T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या विरुद्धच्या पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) जबरदस्त कामगिरी करत त्याचा मनसुबा स्पष्ट केलाय. तो चांगल्या फॉर्ममध्ये आलाय. त्याच्यासोबतच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार बनला आहे. भारताने पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केलाय तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात 82 धावांची नाबाद खेळी करत त्याचा दर्जा काय आहे तो पुन्हा एकदा सिद्ध केलाय. जगातील अव्वल खेळाडूंच्या यादीत येणाऱ्या कोहली सोबत इनिंग खेळणे प्रत्येकाचीच इच्छा असेल. दुसऱ्या विजयातही त्याने नाबाद अर्धशतक झळकावले. पहिल्या सामन्यात कोहलीला सामनावीर आणि दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सामनावीर ठरला.


सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात सूर्याने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर त्याच्या आणि कोहलीमधील (Surya and kohli celebration) सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. या सामन्यात विराटने 62* आणि सूर्याने नाबाद 51 धावा ठोकल्या. त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या पाठीवर थाप मारली आणि लोकांना त्यांच्यातील उबदारपणाची आठवण करून दिली.


सूर्याने इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ


सामन्याच्या एका दिवसानंतर सूर्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात कोहलीसोबतच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आणि अर्धशतक साजरे केल्याची आठवण करून दिली. त्याने व्हिडिओला कॅप्शन दिले - रिव्ह्यू, रिफ्लेक्ट आणि रिपीट - या व्हिडिओमध्ये सूर्या आपले अर्धशतक पूर्ण करणाऱ्या षटकारांकडे बघताना दिसत आहे. फटकेबाजीनंतर विराट कोहलीचे सेलिब्रेशनही पाहायला मिळत आहे.


सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली


यंदाच्या T20 मध्ये विराट आणि सूर्या यांनी केवळ आठ सामन्यांमध्ये 70 पेक्षा जास्त सरासरीने 463 धावा जोडल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेपासून सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये आहेत आणि उत्तम भागीदारी करत आहेत. आशिया चषकाच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँग विरुद्ध दोघांनी 42 चेंडूत 98* धावांची भागीदारी केली. यानंतर, टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत कोहली आणि सूर्याने 42 चेंडूत 104 धावा केल्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील सामन्यात दोघांनी 42 चेंडूत 102 धावांची भागीदारी केली. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही कोहली-सूर्याने 48 चेंडूत 95 धावांची भक्कम भागीदारी करून आपल्या कामगिरीला नवी उंची दिली.