बाबर आझमने सराव सोडून भारत-आयर्लंडचा सामना पाहिला, `हा` विक पॉईंट सापडला
Ind vs Pak T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेटने दणदणीत मात केली. आता टीम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
Ind vs Pak T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवत मिशन टी20 वर्ल्ड कपची दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने (Team India) एकतर्फी झालेल्या सामन्यात आयर्लंडचा (Ireland) 8 विकेटने पराभव केला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने फटकेबाजी करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवून दिलंय. भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. एकूणच या सामन्यातून भारतीय संघाची तयारी जोरदार असल्याचं दिसून आलंय.
पाकिस्तानची नजर
भारत आणि आयर्लंड सामन्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) विशेष नजर होती. मीडिया रिपोर्टनुसार बाबर अँड कंपनीने टीम इंडियाचा संपूर्ण सामना पाहिला आणि त्यांनी टीम इंडियाचा विक पॉईंट शोधून काढला.
बाबर आझमने शोधला विक पॉईंट
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या डलासमध्ये आहे. अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा पहिला सामना रंगणार आहे. पण पाकिस्तानी खेळाडूंची नजर न्यूयॉर्कमधल्या सामन्यावर होती. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार बाबर आझम, मोहम्मद रिझवानसहित संपूर्ण सपोर्ट स्टाफने हा सामना निरखून पाहिला. सामन्यानंतर पाकिस्तानी संघात न्यूयॉर्कची खेळपट्टी आणि तिथल्या परिस्थितीवर चर्चा झाली. यातून पाकिस्तानी संघाने टीम इंडियचा एक विक पॉईंट शोधून काढला आहे.
हा ठरु शकतो टीम इंडियाचा विक पॉईंट?
आयपीएलमध्ये विराट कोहलीने 741 धावा केल्या. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत पुन्हा फॉर्मात आले आहेत. सूर्यकुमार यादव जगातला नंबर वन टी20 फलंदाज आहे. तर हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत कमबॅक केला आहे. आयर्लंडविरुद्ध्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह, अर्शदीप आणि मोहम्मद सिराजने कमाल केली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या तयारीचा पाकिस्तान क्रिकेट संघाला अंदाज आलाय. टीम इंडियावर मात करणं पाकिस्तान क्रिकेट संघाला अशक्य आहे.
अशात पाकिस्तान क्रिकेट संघाने न्यूयॉर्कच्या खेळपट्टीचा फायदा उचलण्याचं ठरवलं आहे. नासाऊ काऊंट क्रिकेट स्टेडिअमवर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला अडणींचा सामना करावा लागतो, हे बाबर आझमने हेरलं आहे. नासाऊच्या खेळपट्टीवर चेंडू जास्त प्रमाणात स्विग होतोय. पाकिस्तानसाठी हाच मुद्दा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. पाकिस्तानकडे शाहिन शाह आफ्रीदी, मोहम्मद आमिर, हॅरिस रौफ आणि नसीम शाह सारखे वेगवान गोलंदाज आहेत. पाकिस्तानची ही वेगवान चौकडी टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी डोकेदुकी ठरू शकते.
भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस महत्त्वाचा ठरणार आहे. टॉस जिंकून पहिली गोलंदाजी घेण्याचा बाबर आझमचा प्रयत्न असणार आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज.
रिजर्व : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, अवेश खान
पाकिस्तानी संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान