T20 World Cup : हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानकडून `रडीचा डाव`, Team Indiaला मारला टोमणा
T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न...
India vs Pakistan T20 World Cup: पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात T20 विश्वचषक स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना होणार आहे. फक्त भारत पाकिस्तानच नाही तर संपुर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. अशातच आता सामन्यापूर्वी पाकिस्तानकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. (T20 World Cup PCB Chairman Rameez Raja Criticized team india called billion dollar team)
T20 World Cup सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारताला बिलियन डॉलर टीम (billion dollar team) म्हणत टोमणा मारला आहे. दोन्ही संघ फक्त आयसीसी (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धांमध्येच भेटतात. या स्पर्धांमध्ये भारताचा पाकिस्तानवर नेहमीच वरचष्मा राहिलाय. त्यामुळे यंदाही भारताचा झेंडा फडकेल, यासाठी रोहितसेना तयारी करताना दिसत आहे.
गेल्या वर्षी T20 विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला होता. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानने भारताचा सुपर-4 मध्ये पराभव केला. त्यामुळे आता पाकिस्तानने स्वत:चीच कॉलर टाईट केल्याचं पहायला मिळतंय. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा (PCB Chairman Rameez Raja) यांनी भारताला श्रीमंत बोर्ड म्हणत टोमणा मारलाय. त्याचबरोबर भांडणं होत असल्याने सामना बघण्यासाठी जाणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले Ramiz Raja
कौशल्य आणि प्रतिभेपेक्षा हा मानसिक सामना असल्याचं राजा यांनी म्हटलंय. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या एकाग्र असाल आणि हार मानायला तयार नसाल तर लहान संघही मोठ्या संघावर मात करू शकतो, असं राजा म्हणाले. जेव्हा जेव्हा भारताने स्पर्धेला तोंड दिलं तेव्हा पाकिस्तान नेहमीच अंडरडॉग राहिला आहे (India vs Pakistan T20 World Cup). परंतू, पाकिस्तान आम्हाला कधीही हरवू शकतो, असं वाटल्याने आता भारताने आम्हाला आदर देण्यास सुरुवात केलीये, असं रमीझ राजा म्हणाले.
"म्हणूनच मी म्हणतो की, पाकिस्तानला श्रेय द्या कारण आम्ही अब्ज डॉलर्सच्या क्रिकेट उद्योगाला (Billion dollar team) हरवलंय. मी स्वतः विश्वचषक खेळलो आहे. आम्ही भारताला हरवू शकलो नाही. या संघाला श्रेय द्यायला हवे कारण ते मर्यादित साधनांसह खेळाडू तयारी करतात आणि भारताच्या तुलनेत कठोर संघर्ष करतात", असं म्हणत रमीझ राजाने पाकिस्तान (Pakistan Team) संघाचं कौतूक केलं आहे.