VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्... क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम
फावल्या वेळात त्यांनी चांगलीत शक्कल लढवली आहे.
मुंबई : टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. भारताने दोन टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. सध्या, भारताचा प्रदीर्घ फॉरमॅट स्पेशालिस्ट टीम बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड विरुद्ध मालिकेतील पाचवा टेस्ट सामना खेळतेय. ज्यामध्ये आयर्लंड T20 सिरीजतील एकही खेळाडू सहभागी नाही पण तरीही त्यांचं काम संपलेलं नाही.
T-20 सिरीजमधील अनेक खेळाडू आयर्लंडहून भारतात जाण्याऐवजी इंग्लंडला रवाना झाले. या टीममधील ज्या खेळाडूंना इंग्लंडमध्ये राहण्यास सांगण्यात आलंय त्यात हार्दिक पांड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. हे तिघेही कसोटी टीमचा भाग नाहीत शिवाय ते सरावही करू शकत नाहीत, मग करायचं काय. अशावेळी फावल्या वेळात त्यांनी चांगलीत शक्कल लढवली आहे.
यादरम्यान या तिन्ही खेळाडूंनी टाइमपाससाठी पारंपरिक भारतीय खेळाचा अवलंब केला आहे. या तिन्ही खेळाडूंच्या या खेळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे हे तीन खेळाडू 'कावळा उड्-चिमणी उड्' खेळताना दिसत आहेत.
हार्दिक, इशान आणि अक्षर तीन म्हणत खेळाला सुरूवात करतात. यामध्ये अक्षर पटेल चूक करणारा पहिला ठरतो. या खेळात अक्षर आऊट झाल्यानंतर तिन्ही खेळाडू खूप एन्जॉय करताना दिसतायत.