Asia Cup 2023 : भारतीय संघातील खेळाडूंनी आशिया चषकामध्ये दमदार खेळाचं प्रदर्शन करत या स्पर्धेत चांगली मुसंडी मारली आहे. आगामी क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्तानं आशिया चषकामध्ये संघाची कामगिरी त्यांचं मनोधैर्य वाढवणारी ठरेल. एकिकडे संघ येऊ घातलेल्या स्पर्धेसाठी आतापासूनच तयारीला लागलेला असताना आणि Asia Cup वर नजर ठेवून असतानाच आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण, संघातील बाजी पलटवणाऱ्या खेळाडूला दुखापतीच्या कारणास्तव या स्पर्धेतून माघार घ्यावी लागू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघानं मंगळवारी पार पडलेल्या श्रीलंकेविरोधातील सामन्यात यजमानांचा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेल्या या Team India नं 11 व्या वेळेस आशिया चषकाची अंतिम फेरी गाठली आहे. पाकिस्तानला धूळ चारत आणि त्यानंतर श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव करत भारतीय संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आला. पण, एका खेळाडूनं मात्र सर्वांचीच चिंता वाढवली. 


तो मैदान सोडून गेला आणि... 


Team India तील तो खेळाडू आहे, जसप्रीत बुमराह. श्रीलंकेविरोधातील सामन्यात बुमराहनं अचानक मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. त्यानं पाचव्या Over ला बूटही बदलला. पण, नंतर मात्र तो मैदानातून निघून गेला. फिजियोनं मैदानावर येऊन बुमराहला मदतही करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा फार फायदा झाला नाही. ज्यामुळं तो तंबूत परतला. यादरम्यान त्यानं 7 षटकांमध्ये 30 धावा देऊन 2 गडी बाद केले होते.


हेसुद्धा पाहा : असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल! Six जाणार असं वाटत असतानाच...; पाहा थक्क करणारा Video


 


अंतिम सामन्याआधी बुमराहच्या दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढल्यामुळं क्रिकेटप्रेमींना आता तो अंतिम सामना खेळणार की नाही? असाच प्रश्न पडत आहे. त्यातच आयसीसी क्रिकेट विश्वचषक अर्थात एकदिवसीय क्रिकेट World Cup पूर्वी बुमराह दुखापतीतून सावरला नाही तर या स्पर्धेतूनही त्याला माघारा घ्यावी लागेल अशीच चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. 


बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर दुखापतीतून सावरणाऱ्या जसप्रीत बुमराहनं भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. त्यामुळं येत्या दिवसांतील मोठ्या सामन्यांमध्ये विरोधी संघातील फलंदाजांना धूळ चारण्यासाठी गोलंदाजांच्या गटात त्याची साध अतिशय महत्त्वाची ठरेल. थोडक्यात बुमराह त्याच्या या दुखापतीतून लवकरात लवकर सावरावा अशीच प्रार्थना क्रिकेटप्रेमी करताना दिसत आहेत.