असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल! Six जाणार असं वाटत असतानाच...; पाहा थक्क करणारा Video

Aus vs SA Sean Abbott Catch Video: सामन्याच्या 47 व्या षटकाच्या चौथा चेंडू हा षटकार जाणार असं वाटत असतानाच अचानक असं काही घडलं की सर्वांनी बोटं तोंडात घातली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 13, 2023, 08:20 AM IST
असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल! Six जाणार असं वाटत असतानाच...; पाहा थक्क करणारा Video title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे

Aus vs SA Sean Abbott Catch Video: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यान सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेमधील तिसरा सामना मंगळवारी पार पडला. पोचेस्ट्रूमच्या मैदानात झालेल्या या सामन्यामधील एक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू शॉन एबॉटने (Sean Abbott) सीमारेषेजवळ एक भन्नाट झेल घेतला. सीमारेषेजवळ पकडलेला हा झेल पाहून अनेकांनी हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल असल्याचं म्हटलं आहे. खरोखरच 31 वर्षीय शॉन एबॉटने ज्या पद्धतीने हा झेल घेतला होता तो पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली. इतकच काय जो फलंदाज बाद झाला त्यानेही हा झेल पाहून डोक्याला हात मारुन घेतल्याचंही कॅमेरात कैद झाला.

नक्की घडलं काय?

ऑस्ट्रेलियन संघ गोलंदाजी करत असताना 47 वी ओव्हर नॅथन एलिसने टाकली. एलिसच्या या ओव्हरमधील चौथा चेंडू ऑफ स्टम्पच्या फारच बाहेर होता. मात्र मोठा फटका मारण्याच्या तयारीत असलेला दक्षिण आफ्रिकेच्या मार्कोस जानसेनने एक पाय ऑफ स्टम्पच्या बाहेर कढून चेंडू हवेत टोलवला. चेंडू बॅटच्या स्वीट स्पॉटला लागल्याने जितका उंच गेला तितक्या लांबही गेला. आता हा षटकार जाणार असं वाटत असतानाच शॉन एबॉट अचानक धावत आला आणि त्याने सीमारेषापासून अवघ्या काही इंचावर असताना हवेत झेप घेत एका हाताने हा चेंडू पकडला.

200 च्या स्ट्राइक रेटने खेळत होता

बरेच अंतर पळत आल्यानंतर शॉन एबॉटने चेंडूच्या दिशेने एक हात पुढे करुन झेप घेत हा भन्नाट झेल घेतला. हा झेल पकडल्यानंतर शरीराचा स्पर्श सीमारेषेला होऊ नये या प्रयत्नात शॉन एबॉट काही अंतर सरकतही गेला. शॉन एबॉटने केलेले प्रयत्न कामी आले आणि नॅथन एलिस बाद झाला. शॉनने एवढा भन्नाट झेल घेतला आहे यावर नॅथन एलिसचा क्षणभर विश्वास बसत नव्हता. नॅथन एलिसने उभ्या जागीच डोक्याला हात मारत मैदान सोडलं. नॅथन एलिसने 16 चेंडूंमध्ये 200 च्या स्ट्राइक रेटने 32 धावा केल्या. त्याने या खेळीमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याची ही खेळी शॉन एबॉटच्या भन्नाट फिल्डींगमुळे संपुष्टात आली. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय

दक्षिण आफ्रिकेने आपल्या नियोजित 50 षटकांमध्ये 338 धावांचा डोंगर उभा केला. 6 गड्यांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेने ही धावसंख्या केली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 34.3 ओव्हमध्ये तंबूत परतला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 111 धावांनी जिंकला.