३ वर्षांपासून टीम इंडिया आहे नंबर वन, पाहा व्हिडिओ
क्रिकेट विश्वात २०१७ साली टीम इंडियाने एकापेक्षा एक असे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात २०१७ साली टीम इंडियाने एकापेक्षा एक असे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. सध्या टीम इंडिया टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे. वन-डे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर तर टी-२०मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विजयाचा मुकुट स्वत:च्या शिरावर
मात्र, टीम इंडियाने केवळ २०१७ सालीच चांगलं यश मिळवलं असं नाहीये. कारण, टीम इंडियाच्या यशाची पुनरावृत्ती २०१५ पासुन सतत घडत आहे. तेव्हा पासून ३१ डिसेंबर २०१७ म्हणजेच सलग तीन वर्षांपासून टीम इंडिया संपूर्ण क्रिकेट विश्वात विजयाचा मुकुट स्वत:च्या शिरावर चढवून घेतला.
टीम इंडियाची कौतुकास्पद कामगिरी
सर्वच फॉर्म्समध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स हा कौतुकास्पद राहीला आहे. या तीन वर्षांमध्ये टीम इंडियाला मिळालेलं यश हे जगभरातील इतर टीम्सपेक्षा अधिक आहे.
टीम इंडियाने सर्वांनाच चारली पराभवाची धूळ
गेल्या ३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर टीम इंडियाने जवळपास सर्वच टीम्सला पराभवाची धूळ चारली आहे. आकड्यांनुसार टीम इंडिया या तीन वर्षांत नंबर एक राहीली आहे.
१ जानेवारी २०१५ ते २०१७ पर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकली तर टीम इंडियाने १३५ मॅचेस खेळल्या आहेत. यापैकी ८७ मॅचेस जिंकल्या, ३६ मॅचेसमध्ये पराभव झाला, ९ मॅचेस ड्रॉ झाल्या आणि ३ मॅचेस अशा होत्या ज्यांचा निकाल लागलाच नाही.
या कालावधीत सर्वाधिक मॅचेस या श्रीलंकन टीमने खेळल्या आहेत. श्रीलंकेने १४१ मॅचेस खेळल्या आहेत आणि त्यापैकी ४५ मॅचेसमध्ये त्यांना विजय मिळाला तर, ८७ मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
२०१७मध्ये टीम इंडियाच्या प्रदर्शनावर नजर टाकली तर एकापेक्षा एक रेकॉर्ड आणि यशाचं शिखर टीम इंडियाने गाठलं आहे. विराट कोहलीने एका वर्षात ४ डबल सेंच्युरी लगावण्याचा कारनामा आपल्या नावावर केला आहे. तर, चायनामॅन कुलदीप यादव याने वन-डे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेत रेकॉर्ड केला.