टीम इंडियाची स्पिनर अडकली पुरात, सोशल मीडियावर शेअर केला VIDEO, NDRF ने वाचवलं
क्रिकेटर राधाने स्वतः याबाबत माहिती दिली असून तिला आणि कुटुंबाला एनडीआरएफने सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.
Indians Cricketer Stuck In Flood : देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खासकरून गुजरात राज्यातील बडोदरा येथे काही भागात भरपूर पाऊस कोसळल्याने सखल भागात पाणी साचले ज्यामुळे अनेक घर ही पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत. टीम इंडियाची स्टार क्रिकेटर राधा यादव हिला सुद्धा या पुराचा फटका बसला. क्रिकेटर राधाने स्वतः याबाबत माहिती दिली असून तिला आणि कुटुंबाला एनडीआरएफने सुखरूप सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे.
टीम इंडियाची स्पिनर राधा यादव हिने बुधवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून लिहिले की, 'आम्ही खूप वाईट परिस्थितीत होतो. आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढल्याबद्दल NDRF चे खूप खूप आभार'. राधाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले होते. तसेच पार्क केलेल्या गाड्या सुद्धा पाण्यात डुबल्या होत्या. तर एनडीआरएफची टीम बोटीच्या सहारे लोकांना रेस्क्यू करत होती.
R Ashwin : अश्विनने निवडली ऑल टाइम बेस्ट Playing 11, 'या' दिग्गज क्रिकेटरकडे सोपवलं कर्णधारपद
24 वर्षांची राधा यादव ही भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार स्पिनर गोलंदाज असून तिने आतापर्यंत टीम इंडियाकडून 80 टी 20 सामने तर 4 वनडे सामने खेळेल आहेत. तिने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी एकूण 90 विकेट्स घेतल्या आहेत. राधा ही महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्समधून खेळते. तर ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या महिला बिग बॅश लीगमध्ये सुद्धा सिडनी सिक्सर्स या टीमकडून खेळते.
इरफान पठाणने सुद्धा केलं आव्हान :
भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाण याने सुद्धा बडोदरा येथील पूर परिस्थतीबाबत चिंता व्यक्त केली. इरफान पठाणने लोकांना या परिस्थती घरातच राहण्याची विनंती केली. बडोदरा येथील पूरपरिस्थितीत एनडीआरएफच्या टीम लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत. हवामान विभागाने सौराष्ट्रमध्ये गुरुवारी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे .