मुंबई : टीम इंडियाच्या टी 20 आणि वनडे टीमचा कर्णधार ठरलाय. विराट कोहलीच्या जागी मुंबईकर उपकर्णधार रोहित शर्माला दोन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद देण्यात आलं. त्यामुळे आता उपकर्णधारपद रिक्त आहे. त्यामुळे आता रोहितची जागा कोण घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. उपकर्णधारपदासाठी 3 खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. (team india this 3 players who race in vice captain position in odi and t 20i format)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे यापैकी एक खेळाडू हा प्रबळ दावेदार समजला जातोय. उपकर्णधारपदासाठी केएल राहुल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या तिघांच्या नावाची चर्चा आहे.


रिषभ पंत


रिषभ पंतला उपकर्णधारपद सोपवण्यात यावं, अशा मताचा एक गट आहे. त्यांच्यानुसार, पंतला टी 20 आणि वनडे संघाचा उपकर्णधारदाची सूत्र सोपावयला हवी. पंत आयपीएलमध्ये दिल्लीचं नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात लीग स्टेजमध्ये दिल्ली अव्वल स्थानी होती. पंतने कॅप्ट्न्सीसह विकेटकीपिंगची जबाबदारीही सार्थपणे पार पाडली. त्यामुळे रिषभचं नाव उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.  


जसप्रीत बुमराह


जसप्रीत बुमराह, टीम इंडियाचा प्रमुख आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज. बुमराहने आतापर्यंत टीम इंडियाला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. बुमराहला गोलंदाजी व्यतिरिक्त विशेष असा अनुभव नाही. त्यामुळे बुमराहदेखील उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.


केएल राहुल


उपकर्णधारपदासाठी केएल राहुल प्रबळ दावेदार समजला जातोय. त्यामागे कारणही तसंच आहे. केएलने आयपीएलमध्ये विकेटकीपिंग, बॅटिंग आणि कॅप्टन्सी अशी तिहेरी भूमिकी सार्थपणे पार पाडलीये.


तर दुसऱ्या बाजूला केएल हा बुमराह आणि पंतच्या तुलनेत अनुभवी आहे. यामुळे एकूणच सर्वच बाबतीत केएल या दोघांना वरचढ आहे. यामुळे केएलची उपकर्णधार होण्याची शक्यता ही अधिक आहे. त्यामुळे आता रोहितचा उत्तराधिकारी कोण होणार, याकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष असणार आहे.