तिरुअनंतपुरम : न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडनंतर आता भारत श्रीलंकेविरुद्ध ३ टेस्ट, ३ वनडे आणि ३ टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. १६ नोव्हेंबरपासून श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. तर २४ डिसेंबरला तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्ट क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर वनडेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे क्रमवारीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिेकेचे १२० पॉईंट्स आहेत. फक्त काही अंशांच्या फरकामुळे भारत वनडे क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रमवारीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी आणि टी-20मधली क्रमवारी सुधारण्यासाठी विराट सेना मैदानात उतरेल.


भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक


टेस्ट सीरिज


१६ ते २० नोव्हेंबर- पहिली टेस्ट- कोलकाता


२४ ते २८ नोव्हेंबर- दुसरी टेस्ट- नागपूर


२ ते ६ डिसेंबर- तिसरी टेस्ट- दिल्ली


वनडे सीरिज


१० डिसेंबर- पहिली वनडे- धर्मशाला


१३ डिसेंबर- दुसरी वनडे- मोहाली 


१७ डिसेंबर- तिसरी वनडे- विशाखापट्टणम


टी-20 सीरिज


२० डिसेंबर- पहिली टी-20- कटक


२२ डिसेंबर- दुसरी टी-20- इंदूर


२४ डिसेंबर- तिसरी टी-20- मुंबई