नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर टीम इंडियानं त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील खेळाडू दंडावर काळया फिती बांधून मैदानात उतरले होते. राजकारणासोबतच अरुण जेटली क्रिकेटशीही संबंधित होते. त्यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्षपदही भुषविले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली क्रिकेट संघटनेचे ते दीर्घकाळ अध्यक्ष होते. दिल्लीतील क्रिकेटच्या सुधारणेसाठी आणि नवीन स्टेडियम बांधण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रयत्नांमुळे दिल्लीतील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली.  जेटलींच्या निधनानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.


सोनिया गांधींचं जेटलींच्या पत्नीला भावनिक पत्र


अरूण जेटली यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काल जेटली यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून कैलाश कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.


तुम्ही परदेश दौरा अर्धवट टाकून माघारी येऊ नका; जेटलींच्या कुटुंबीयांची मोदींना विनंती