न्यूझीलंड : आज महिला वर्ल्डकपमध्ये भारत विरूद्द वेस्ट इंडिज असा सामना सुरु आहे. दरम्यान यावेळी भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णाधार मिताली राज हिने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजविरूद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यावर तिच्या नावे हा रेकॉर्ड झाला आहे. हा सामना जिंकून ती हा क्षण अजूनही खास करण्याच्या तयारीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिताली राज वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जास्त 24 सामने खेळाणारी जगातील पहिली खेळाडू बनली आहे. यामध्ये तिने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कचा रेकॉर्ड मोडला आहे. बेलिंडाने कर्णधार म्हणून वर्ल्डकपचे 23 सामने खेळले आहेत. 


वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी मितालीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 23 पैकी 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर यामधील 8 सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. 



कर्णधार म्हणून वर्ल्डकप जिंकण्याच्या बाबतीत मिताली संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये मितालीसोबत ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार शेरॉन ट्रेडेरियाही दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिताली राजने तिच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा पराभव केला तर ती विजयाच्या बाबतीत शेरॉनला मागे टाकू शकते. विजयाच्या बाबतीत बेलिंडा क्लार्क अजूनही अव्वल स्थानावर आहे. तिने 23 पैकी 21 सामने जिंकले आहेत.


मितालीने धोनी आणि अझरूद्दीलाही टाकलं मागे


वर्ल्डकप (पुरुष-महिला) मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी मिताली ही पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. या प्रकरणात तिने 23 वनडे खेळलेल्या मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून त्याने 17 सामने खेळले आहेत. 


मिताली राज    24 वनडे
अझरुद्दीन     23 वनडे
एमएस धोनी    17 वनडे