बंगळूरू : मार्च आणि एप्रिलमध्ये खेळल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामासाठीचा मेगा लिलाव (Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू इथे सुरु आहे. या लिलावात 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी लावलेल्या बोलीमध्ये भारताचा धडाकेबाज खेळाडू सुरैश रैना अनसोल्ड राहिला आहे. सुरेश रैनाची बेस प्राईज 2 करोड होती. मात्र कोणत्याही टीमने सुरेश रैनावर बोली लावली नाही. यापूर्वी सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.


सुरेश रैनाने आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये 5 हजार रन्स करणारा रैना पहिला फलंदाज आहे. याशिवाय प्रत्येक आयपीएल हंगामात त्याने 400 हून अधिक रन्स केलेत. साधारणपणे 3 व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा रैना चेन्नई सुपर किंग्ज महत्त्वाचा खेळाडू होता.


सुरेश रैनाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 205 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 32 च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 39 अर्धशतकांचाही समावेश आहे. फलंदाजीसोबत रैना मधल्या गोलंदाजीही करू शकतो. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये 25 विकेट्स आहेत.


त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि साऊथ आफ्रिकेचा हिटर डेव्हिड मिलर देखील अनसोल्ड राहिले आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. अनसोल्ड राहिलेल्या या खेळाडूंचं नशीब उद्या बदलण्याची शक्यता आहे.