धर्मशाला : वेस्ट इंडिजनंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेला देखील टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप दिला आहे. काल झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाचा हा सलग 12 वा विजय होता. यामुळे रोहित शर्मा अत्यंत खूश होता. मात्र पुन्हा एकदा खेळाडूच्या चुकीमुळे त्याला राग अनावर झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात एक क्षण असा आला होता की, कर्णधार रोहित शर्मा एका खेळाडूवर चांगलाच वैतागला होता. फिल्डींग दरम्यान विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातून एक चूक झाली आणि रोहित शर्माला राग अनावर झाला. 


श्रीलंका फलंदाजी करत असताना 16 व्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनच्या हातातून एक बॉल सुटला. यामुळे श्रीलंकेला 4 रन्सही मिळाले. यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच नाराज झाला. त्यावेळी हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. आणि त्याच्या बाऊंसरवर संजू बॉल पकडू शकला नाही. यानंतर रोहित वैतागला आणि त्याचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरलही झाला.


टीम इंडियाने (Team India) विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा तिसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 3rd T20I) 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने लंका दहन केलं आहे. टीम इंडियाने या विजयासह श्रीलंकेला क्लीन स्पीप दिला आहे. टीम इंडियाने 3-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.


सलग 12 वा टी 20 विजय 


टीम इंडियाचा हा सलग 12 वा टी 20 विजय ठरला आहे. यासह टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधली आहे. याआधी 11 वा सामना जिंकून टीम इंडियाने पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक केला होता.  


दरम्यान आता टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिकेनंतर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे.