मुंबई : दक्षिण आफ्रिकेनंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरूद्ध सीरीज खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 6 फेब्रुवारीपासून वनडे सीरीजला सुरुवात होणार आहे. मात्र वनडे सीरीज सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज सीरीज सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन दुखापतीमुळे वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो दीर्घकाळानंतर छोट्या फॉरमॅटमध्ये परतला होता. मोठमोठे फलंदाज अश्विनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकताना दिसतात. 


रविचंद्रन अश्विनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळाली, पण तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, अश्विन तो खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडणार आहे. त्याच्या जागी गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळू शकते.


आज होणार वनडे टीमची घोषणा


फीटनेसच्या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर असलेला रोहित नेतृत्व करण्यास तयार आहे आहे. रोहित बुधवारी सकाळी 11.30 वाजता फिटनेस चाचणी टेस्ट देईल आणि त्यानंतर टीमची घोषणा केली जाईल. 


16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, “रोहित फीट असून आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे.