Neeraj Chopra: गोल्ड मेडल जिंकण्यासाठी मी...; फायनलमध्ये धडक दिल्यानंतर काय म्हणाला नीरज चोप्रा?
Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.
Neeraj Chopra Statement After Qualify For Final in Javelin Throw: 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांना गोल्ड मेडलसाठी भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याकडून अपेक्षा आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात नीरज चोप्राने देखील चाहत्यांना निराश केलं नाही. गेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा नीरज चोप्रा यंदाच्या भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरणार नाही असं दिसतंय. आता पुन्हा एकदा नीरजकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर नीरज चोप्रा खूप आनंदी दिसला. यावेळी त्याने तो पुन्हा सुवर्ण जिंकण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलंय.
पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भालाफेक करून फायनलसाठी पात्र ठरल्यानंतर नीरज चोप्रा म्हणाला, "मी फायनलसाठी सज्ज आहे. पहिल्याच प्रयत्नात मी यशस्वी झालो आहे. यामुळे मला अजून आत्मविश्वास मिळाला. मी पूर्णपणे फीट आहे. मला कोणतीही दुखापत नाहीमी बरा झालो आहे, त्यामुळे मी या वर्षी पुन्हा सुवर्ण जिंकण्यासाठी तयार आहे.
क्लालिफिकेशन राऊंडमध्ये पहिल्या स्थानावर होता नीरज
नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे नीरजने आजही भारतीयांना निराश केलं नाही. नीरजने 89.34 मीटर लांब भाला फेकला अन् पहिल्याच प्रयत्नात यश गाठलं. आता नीरजला आणखी मजबूत फायनलमध्ये करावी लागणार आहे. नीरजची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी 89.94 मीटरपर्यंत दूर भाला फेकण्याची आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये नीरज किती लांब भाला फेकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
कधी आहे नीरजचा फायनल सामना
दरम्यान, फायनलमध्ये नीरज चोप्राचा सामना पाकिस्तानच्या अर्शद नदीम याच्यासोबत असणार आहे. तर ग्रेनेडियन भालाफेकपटू अँडरसन पीटर्स देखील तोडीसतोड खेळाडू ठरू शकतो. अँडरसन पीटर्सने 88.63 मीटर लांब भाला फेकला. आता येत्या 8 तारखेला फायनल सामना खेळवला जाईल. 8 ऑगस्टला रात्री 11.55 वाजता अंतिम सामना खेळवला जाईल.