Happy Birthday Virat Kohli : `रन मशीन` कोहली आज चाहत्यांना कोणतं गिफ्ट देणार? जाणून घ्या...
#HappyBirthdayViratKohli : Virat Kohli चा आज वाढदिवस आहे. मात्र कोहलीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.
Happy Birthday Virat : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आशिया कपपासूनच (Asia Cup) फलंदाजीत जबरदस्त लय पकडली आहे. त्याचा धावांचा ओघ ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) देखील सुरूच असून त्याने आतापर्यंत चार सामन्यात तीन अर्धशतके ठोकली आहेत. दरम्यान आज 5 नोव्हेंबरला किंग कोहली आपला 34 वा वाढदिवस (Happy Birthday Virat Kohli ) साजरा करणार आहे. जगभरातील त्याचे चाहते त्याला एक भन्नाट गिफ्ट देण्याचे प्लॅनिंग करत आहेत. त्यामुळे ट्विटवर विराट कोहली संदर्भात एक वेगळाच हॅशटॅग ट्रेंग करताना दिसतोय. मात्र याचदरम्यान ज्याचा वाढदिवस आहे त्याला गिफ्ट देण्याची प्रथा आहे, पण जगविख्यात फलंदाज विराट कोहलीची बातच न्यारी. कोहलीच आपल्या वाढदिवसाचं गिफ्ट आपल्या चाहत्यांना देणार असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.
भारतााचा रन मिशन
विराट कोहलीने 14 वर्षांपूर्वी 18 ऑगस्ट 2008 रोजी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा, शतके, द्विशतकं, अर्धशतकं झळकावणारा किंवा त्याच्यापेक्षा जास्त सामनावीर आणि मालिकावीर अशी खिताब जिंकणारा कोणीही नाही.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून-
सर्वाधिक धावा - कोहली (24350)
सर्वाधिक शतके - कोहली (71)
सर्वाधिक 50 - कोहली (128)
सर्वाधिक 200 - कोहली (7)
सर्वोच्च सरासरी - कोहली (53.99)
सर्वात जास्त मॅच ऑफ द मॅच - कोहली (60)
सर्वाधिक जास्त प्लेयर ऑफ द मॅच - कोहली (19)
वाचा : "प्रेमापोटी क्रिकेट खेळण्याचे दिवस गेले", T20 World Cup जिंकणाऱ्या कॅप्टनने बोलून दाखवली खंत!
विराट कोहलीची क्रिकेट कारकीर्द
5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत जन्मलेल्या विराट कोहलीने सुरुवातीपासूनच दाखवून दिले होते की तो सक्षम आहे आणि तो खूप पुढे जाऊ शकतो. 2008 मध्ये, त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिले आणि काही दिवसांनंतर, त्याची प्रतिभा पाहून त्याला भारतीय एकदिवसीय संघात प्रवेश मिळाला. 2008 मध्ये, तो भारतासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला. परंतु दोन वर्षानंतर त्याला T20 संघात स्थान मिळाले आणि त्याने 12 जून 2010 रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळला.
कसोटी क्रिकेटबद्दल सांगायचे तर, त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केल्यानंतर तीन वर्षांनी किंग्स्टनमध्ये 20 जून 2011 रोजी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळायला मिळाला. तेव्हापासून तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा भाग आहे. कोहलीने भारतासाठी 102 कसोटी सामन्यांमध्ये 49.53 च्या सरासरीने 27 शतकांसह 8074 धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 254 नाबाद आहे.
त्याच वेळी 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 57.68 च्या सरासरीने 12,344 धावा केल्या आहेत. आणि 43 शतके ठोकली आहेत तर सर्वोत्तम धावसंख्या 183 धावा आहे. कोहलीने भारतासाठी 113 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 53.13 च्या सरासरीने 3932 धावा केल्या आहेत आणि शतक देखील केले आहे तर सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 122 आहे.