Virat Kohli Birthday: वाढदिवसाआधीच 'या' खेळाडूने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा

पठ्ठयाने कमालच केली! अनुष्काच्या आधीच विराटला देऊन टाकल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कोण आहे 'हा' खेळाडू? 

Updated: Nov 4, 2022, 11:05 PM IST
 Virat Kohli Birthday: वाढदिवसाआधीच 'या' खेळाडूने विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा title=

पर्थ : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli birthday) 5 नोव्हेंबरला 34 वर्षांचा होणार आहे. या दिवसाची लाखो-करोडो चाहते वाट बघत आहेत.या चाहत्यांना कधी एकदा असं झालंय कि तो दिवस उजाडतोय आणि ते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यात आता एका खेळाडूने वाढदिवसाआधीच विराटला (Virat Kohli) शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हा खेळाडू कोण आहे ? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

हे ही वाचा : टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण 

विराट कोहली (Virat Kohli) उद्या 5 नोव्हेंबरला शनिवारी त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण चाहते आजपासूनच आपल्या आवडत्या क्रिकेटरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात मग्न आहेत. याशिवाय अनेक क्रिकेटपटू विराट कोहलीला (Virat Kohli Birthday) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) ट्विट करून विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा : अंपायरींगचा कळसचं! लाईव्ह सामन्यात झाली सर्वांत मोठी चुक 

कोण आहे हा खेळाडू? 

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) विराट कोहलीला (Virat Kohli) वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याला ऑल टाईम ग्रेट म्हटले आहे.शाहनवाज पाकिस्तानी संघाचा एक भाग आहे आणि सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघासह ऑस्ट्रेलियात आहे. 

हे ही वाचा : सुर्यकुमार यादवची Love Story आहे खुपच खास, रोमँटीक Photo सह जाणून घ्या 

शाहनवाज दहानीने (Shahnawaz Dahani) विराट कोहलीसोबतचा एक फोटो ट्विट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ज्या व्यक्तीने क्रिकेटला सुंदर खेळ बनवले आहे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी 5 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करू शकत नाही, असे हटके ट्विट करत त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. 

शाहनवाजने (Shahnawaz Dahani) ट्विटमध्ये पुढे लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा ऑल टाईम ग्रेट. या दिवसाचा आनंद घ्या आणि क्रिकेट जगताचे असेच मनोरंजन करत रहा. शाहनवाजचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. 

हे ही वाचा : ...तर टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये 'गेम' होणार?

दरम्यान टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया (Team India) आता 6 नोव्हेंबर रोजी झिंबाब्वेविरुद्ध (zimbabwe) शेवटचा सुपर-12 फेरीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच सेमी फायनलमधील स्थान आणखीण पक्क होणार आहे.