Uddhav Thackeray Shivsena MLA On Prithvi Shaw: भारताचा तरुण क्रिकेटपटू पृथ्वी शॉ सध्या चांगलाच चर्चेत आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या लिलावामध्ये 75 लाखांची बेस प्राइज ठेऊनही पृथ्वीला कोणत्याच संघाने विकत घेतलं नाही. त्यानंतर घरगुती टी-20 स्पर्धा असलेल्या सय्यत मुश्ताक स्पर्धेतही पृथ्वी यशस्वी ठरला नाही. याच पार्श्वभूमीवर पृथ्वीचं नेमकं काय चुकतंय याबद्दल अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून चर्चेत असलेल्या या खेळाडूने भारताला 2018 साली 19 वर्षांखालील विश्वचषकही जिंकून दिला होता. पदार्पणाच्या कसोटीत दमदार शतक झळकावणाऱ्या पृथ्वीच्या करिअरला उतरतील कळा लागलेली असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या आमदाराने त्याच्याबद्दल सूचक विधान केलं आहे.


ठाकरेंच्या कोणत्या आमदाराने नोंदवली प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीची सध्याची लाइफस्टाइल, त्याला प्रेरणा मिळण्यासारखं काहीच घडत नसल्याची चर्चाही सुरु आहे. असं असतानाचा आता ठाकरेंच्या पक्षाचे कलिना मतदारसंघाचे आमदार संजय पोतनीस यांनी पृथ्वीबद्दल भाष्य केलं आहे. त्यांनी पृथ्वीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना, पृथ्वी शॉच्या आजूबाजूला योग्य लोक नाहीत, असं पोतनीस यांनी म्हटलं आहे. तसेच पृथ्वीच्या आजूबाजूला असणारे लोक त्याची फसवणूक करत असल्याचा आरोपही पोतनीस यांनी केला आहे. तसेच पृथ्वीच्या आजूबाजूच्या लोकांना त्याने दमदार कमबॅक करण्यासाठी काय करावं हे सुद्धा कळत नसल्याचा दावा पोतनीस यांनी केला आहे.


त्याची काळजी करणारं कोणी नाही


"त्याचा खेळ वाईट नाहीये. मात्र त्याच्या आजूबाजूला असलेले लोक फार वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी कोणीच त्याच्या खेळाबद्दल बोलत नाहीये. सगळे लोक केवळ त्याचा फायदा घेत आहेत. सध्या त्याच्याबरोबर कोणीच नाहीये असं चित्र दिसत आहे. तो आता पूर्णपणे केवळ स्वत:वर अवलंबून असल्याचं दिसतंय. जेव्हा तो (सांताक्रुझमधून जुहू आणि तिथून पुढे वांद्रे येथे) स्थायिक झाला तेव्हापासून त्याची काळजी करणारं कोणीही नाहीये," असं पोतनीस यांनी 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 


याच आमदाराने दिलेला मोफत फ्लॅट


पोतसीन हे तेच आमदार आहेत ज्यांनी पहिल्यांदा पृथ्वी शॉच्या कुटुंबियांना सांताक्रुजमध्ये मोफत फ्लॅट दिला होता. यामुळे पृथ्वी शॉचा विरारवरुन रोज मुंबई शहरात अप-डाऊन करण्याचा भरपूर वेळ वाचला होता. आता त्याच पोतनीस यांनी पृथ्वीकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नसल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी पृथ्वीने त्याच्या वजनावर काम केलं पाहिजे असं म्हटलं आहे. पृथ्वी आळस करत असल्याने त्याच्या वाट्याला हे सारं आल्याचा दावा अनेकांनी केला आहे.