केएल राहुलच्या विकेटवरुन सोशल मीडियावर नाराजी, थर्ड अंपायरकडून चूक?
सोशल मीडियावर टीम इंडियाचे चाहते केएल राहुलच्या विकेटवर नाराजी व्यक्त करत आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना द ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाला पुन्हा एकदा सामन्यात भारताची बाजू मजबूत केली आहे. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि केएल राहुल, सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण केएल राहुलला आऊट दिल्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला.
रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारताच्या दुसऱ्या डावात शानदार सुरुवात केली. या दोन फलंदाजांमध्ये 83 धावांची मोठी भागीदारी झाली. पण ही भागीदारी जेम्स अँडरसनने 34 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोडली. राहुलला मैदानावरील अंपायरने नॉट आऊट दिले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने रिव्हू घेण्याचे ठरवले.
जेव्हा राहुलच्या बॅटमधून चेंडू बाहेर आला, तेव्हा स्निको मीटरच्या ओळींमध्ये नक्कीच एक हालचाल होती. त्यानंतर तिसऱ्या अंपायरने राहुलला आऊट दिले. पण राहुल या निर्णयावर पूर्णपणे नाखूष दिसत होता. सोशल मीडियावरही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
वास्तविक, राहुलच्या प्रतिक्रियेवरून असे वाटले की त्याची बॅट चेंडूला नाही तर त्याच्या पॅडला लागली, त्यानंतर स्निको मीटरमध्ये हालचाल झाली. या निर्णयाबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. विशेषतः रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा. रोहितच्या बॅटने परदेशी भूमीवर पहिले शतक ठोकले. रोहितने 127 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. याशिवाय पुजाराने 61 धावा केल्या. केएल राहुलच्या बॅटमधून 46 धावा आल्या.