कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच रंगात दिसत आहे. बॅटींगसाठी आल्यावर असो वा स्टम्पच्या मागे उभा असलेला असो तो सर्वांना चकीत करतो आहे. पहिल्या सामन्यात त्याने दमदार बॅटींग करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुस-या सामन्यात भलेही त्याची फटकेबाजी जास्त चालली नाही. पण त्याने स्टम्पच्या मागे मात्र कमाल दाखवला आहे. धोनीने विकेटकिपींग करत दोन विकेट घेतल्या आहेत. यातील एक कॅच तर कुलदीप यादवच्या बॉलवर होता. त्या विकेटने त्याची हॅट्रिक पूर्ण झाली. 



मात्र धोनीने मॅक्सवेलची स्टंपिंग करून घेतलेल्या विकेटचं जास्त कौतुक होत आहे. धोनीने विजेच्या वेगाने मॅक्सवेलला आऊट केले. युजवेंद्र चहलच्या बॉलवर धोनीने इतक्या वेगाने स्टंपिंग केलं की, लोकांचा विश्वास बसत नव्हता. यानंतर सोशल मीडियात त्याची तुलना विजेच्या वेगासोबत होऊ लागली आहे.