Video: राखीव खेळाडू राधा यादवने घेतला जबरदस्त झेल, बघून जेमिमाह रॉड्रिग्सही झाली थक्क
Radha Yadav: दिल्लीत भारताच्या पुरुष संघाने बांगलादेशविरुद्ध ८६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर महिला संघाने T20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा 82 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
भारतीय पुरुष आणि महिला संघाने बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी दोन सामने खेळलले. एकीकडे पुरुष संघाचा सामना बांगलादेशशी झाला, तर महिला संघाचा सामना श्रीलंकेशी झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाने दमदार खेळी केली. पुरुष संघाने बांगलादेशविरुद्ध 86 धावांनी विजय मिळवला आणि महिला संघाने श्रीलंकेचा 82 धावांनी पराभव केला. या दोन्ही सामान्य दरम्यान दोन उत्तम झेल पाहायला मिळाले, ज्यांनी सर्वत्र चर्चा होत आहे. हा एक झेल होता हार्दिक पांड्याचा तर दुसऱ्या होता राधा यादवचा.
राधा यादवचा झेल
महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर केलेल्या शानदार झेलसाठी डावखुरा फिरकीपटू राधा यादवला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. बुधवारच्या सामन्यात राधाने एक आश्चर्यकारक झेल घेतला आहे. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर विश्मी गुणरत्नेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी तिने क्रीजवरून फटके मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे बॉल वर्तुळापासून थोड्या अंतरावर हवेत उंच गेला. यावेळी सब्टिट्यूट म्हणून आलेली राधा पॉईंटवर उभी होती. ती नीट बॉलवर नजर ठेवून शेवटी शेवटी फुल लेन्थ डायव्ह करत चेंडू पकडला. हा झेल प्रेक्षकांनाही आवडला. तिचा हा कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
पांड्या आणि राधा यादवची जादू
दुसऱ्या T-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने बांगलादेशला 222 धावांचे लक्ष्य दिले होते. बांगलादेशी टीम त्याच्या डावात केवळ 86 धावांत 6 विकेट गमावल्या. यानंतर 14व्या षटकात वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर रिशाद हुसेनने लांबलचक फटका मारला. या शॉटवर हार्दिकने 27 मीटर धावत एका हाताने चेंडू पकडला. या झेल असा होता की क्षणभर असं वाटलं की हार्दिक हा चेंडू सोडेल पण त्याने उत्तम झेल घेतला. अशाप्रकारे हार्दिक पंड्याची क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली.
मालिका संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा वाढल्या
भारतीय संघ आता मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. 82 धावांच्या फरकाने मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला संघाचे मनोबल वाढले आहे. उपांत्य फेरीत जाण्याच्या त्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. गुणतालिकेत भारतीय संघ 4 गुण आणि +0.576 च्या निव्वळ धावगतीने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. एका गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीत जातील.