IND vs BAN: सूर्याने बांगलादेशच्या जखमेवर लावलं मीठ, कसोटीनंतर T-20 मालिकाही आली हातात!

India vs Bangladesh 2nd T20: भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाने कसोटी मालिका गमवल्यावर आता  बांगलादेशने T-20 मालिकाही गमावली आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 9, 2024, 11:06 PM IST
IND vs BAN: सूर्याने बांगलादेशच्या जखमेवर लावलं मीठ, कसोटीनंतर T-20 मालिकाही आली हातात! title=
Photo Credit: @indiancricketteam / Instagram

IND vs BAN 2nd T20I: भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशाला आता पुन्हा एकदा धक्का बसला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली बांगलादेशला कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर बांगलादेशने T-20 मालिकेत विजयाच्या आशेने प्रवेश केला होता. परंतु आता बांगलादेशाने  ही मालिकाही गमावली आहे. दिल्लीत आज बुधवारी झालेल्या सामन्यात  बांगलादेशला 86 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील T20 संघाने बांगलादेशवर 2-0 अशी आघाडी घेतली आहे. 

कोणी जिंकले नाणेफेक? 

बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने सुरुवात छान केली. बांगलादेशने सुरुवातीला सूर्या, सॅमसन आणि अभिषेकच्या विकेट्स घेतल्या. पण 21 वर्षांचे नितीश रेड्डीने दमदार खेळी करत 34 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 7 षटकार दिसले.

रिंकू सिंगचे उत्तम सहकार्य 

नितीश रेड्डीला रिंकू सिंगची साथ मिळाली. रिंकूने 29 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 5 चौकार आले. हार्दिक पांड्यानेही उत्तम खेळ करत 32 धावांची खेळी केली. या उत्तम खेळीमुळे भारताने बांगलादेशविरुद्ध T-20 मधील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली. भारताने बांगलादेशविरुद्ध २२१ धावा केल्या. 

 

भारताच्या गोलंदाजी ठरली सर्वोत्तम 

सामन्यात भारताला 7 विकेट्स घेतल्या आल्या. वरुण चक्रवर्ती आणि नितीश रेड्डी यांनी 2-2 तर उर्वरित गोलंदाजांनी 1-1 बळी घेतले. भारताने हा सामना 86 धावांनी जिंकला.