Vinesh Phogat Prize Money : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचली होती. पण 100 ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे विनेश फोगाट महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल सामन्यापासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे तिच ऑलिम्पिकमधील पदकाच स्वप्न अधुरं राहिलं. पण फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी तिने ज्या प्रकारे आपल्या खेळाच प्रदर्शन दाखवलं, ते कौतुकास्पद होतं. विनेश फोगाटला किमान सिलव्ह मेडल मिळावं म्हणून तिने  क्रीडा लवादात धाव घेतली होती. पण हा निकालही तिच्या बाजूने लागला नाही. अशात निराश झालेली भारताची ही लेक मायदेशात परतली. त्यानंतर विमानतळाबाहेर तिच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. ढोल ताशाच्या गजरात तिचं स्वागत करण्यात आलं. 


Vinesh Phogat ला खरंच मिळाले 16 कोटींचं बक्षीस?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून विनेश फोगट सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्यामुळे तिच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असा दावा करण्यात येतोय की. विनेश मायदेशात परतल्यानंतर तिच्यावर पैशांची बरसात झाली आहे. तिला बक्षीस म्हणून जवळपास 16 कोटी मिळाल्याचा दावा एक पोस्टमध्ये करण्यात आलाय. ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. या 16 कोटींच्या बक्षीसाचं सत्य काय आहे हे सांगण्यासाठी अखेर तिचे पती सोमवीर राठी यांना समोर यावं लागलं. 



पती म्हणाला की, 'हे एक साधन...'


विनेश फोगटला 16 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याबाबत व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, हरियाणा व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय जाट महासभा, पंजाब जाट असोसिएशन, शहीद भगतसिंग असोसिएशन आणि एकेएम यांनी त्यांना 16 कोटी रुपयांचे बक्षीस दिलंय. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला 2 कोटींचे बक्षीस मिळालंय. याशिवाय अशा अनेक संस्थांची नावं आहेत ज्यांच्याबद्दल असं म्हटलंय की त्यांनी विनेशला एक कोटींची बक्षीस रक्कम दिलीय. 


सोमवीर यांनी ही बातमी चुकीची ठरवली आहे. सोमवीर म्हणाले की, 'तुम्ही सर्व आमचे हितचिंतक आहात, कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. यामुळे आपलं नक्कीच नुकसान होईल. सामाजिक मूल्यांचीही हानी होईल. स्वस्त लोकप्रियता मिळविण्याचं हे एक साधन आहे.'