मुंबई : टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचं वेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, यात विराट कोहली सारख्या चमकत्या खेळाडूला १०० टक्के सॅलरी वाढवून मिळण्याचा प्रस्ताव आहे.


विराटचं मानधन आणखी वाढणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने २०१७ मध्ये ४६ मॅचेस खेळून साडेपाच कोटी कमवले, यावेळी यात १० कोटी रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.


समान वेतनासाठी नवा फॉर्म्युला


सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशंसकांची समिती, अशा एका फॉर्म्युल्यावर काम करीत आहे, ज्यात आता १८० कोटी रूपयांचा बजेट असेल, पण पुढील सिझनसाठी २०० कोटी रूपयांचा फायदा असेल.


आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह इतरांनाही समान वेतन


भारताच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंशिवाय, अंतर्गत खेळाडूंचं वेतनही वाढवण्याची तयारी सुरू आहे. सीओएने असे फॉर्म्युल्यांवर काम करीत आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय आणि अंतरर्गत क्रिकेटर्सचं वेतन यांच्यात समानता येतील. 


विराट आणि रवी शास्त्रींनी मांडली व्यथा


बीसीसीआयच्या जनरल मिटिंगमध्ये हा फॉर्म्युला ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, आणि कोच रवी शास्त्रीने खेळाडूंना वेतन वाढीच्या भावना अधिक तीव्रपणे बीसीसीआय समोर ठेवल्या.


समान फॉर्म्यूल्याची अंमलबजावणीची शक्यता


बीसीसीआय सध्या वार्षिक बजेटच्या २६ टक्के तीन समभागात वाटतं, ज्यात १३ टक्के आतंरराष्ट्रीय खेळाडूंना आणि १०.०६ अंतर्गत खेळाडूंना, तसेच इतर महिला आणि ज्युनियर खेळाडूंना देखील दिले जातात. मात्र आता हा फॉर्म्यूला बदलून समान होण्याची शक्यता वाढली आहे.