VIDEO : अनुष्काच्या साथीने `विराट` विजयाचं खास सेलिब्रेशन
पाहा या आनंदाचे खास क्षण
मुंबई : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या मातीवर इतिहास रचला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच मातीवर धुळ चाखवली आहे. आणि भारतीय संघाने टेस्ट सीरिजची ट्रॉफी आपल्या नावे केली.
ऑस्ट्रेलियामध्ये सीरिज जिंकल्यानंतर माजी कॅप्टन एलन बॉर्डरने विराट कोहलीला बॉडर-गावस्कर ट्ऱॉफी सुपूर्त केली. या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने आपल्या आनंदात पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील सहभागी करून घेतलं.
विजयानंतर कोहली आपल्या पत्नीला अनुष्काला मैदानावर घेऊन आला आणि तिला मिठी मारली. एवढंच नव्हे तर या दोघांनी एकमेकांसोबत फोटो देखील काढले.
पावसामुळे पाचवा आणि शेवटचा सामना झाला नाही. पंचांनी लंचनंतर मॅच ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारतीय संघाने चार मॅचची सिरीज 2-1 ने आपल्या नावे केली. याप्रमाणे भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्या नावे करू घेतली.
अनुष्का आणि विराटने ख्रिसमस आणि नवीन वर्षांच सेलिब्रेशन ऑस्ट्रेलियात केलं. नवऱ्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजय मिळवल्याचा आनंद अनुष्काच्या चेहऱ्यावर दिसत होता.
अनुष्का यावेळी शुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. अनुष्का प्रत्येक सामन्यात टीम इंडिया आणि विराटला प्रोत्साहन दिसताना दिसली. अनुष्काप्रमाणेच इतर खेळाडूंच्या कुटुंबातील मंडळी देखील मैदानावर उपस्थित होते. अनुष्का-विराटने या विजयाचा आनंद एकत्र साजरा केला. सोशल मीडियावर याचे फोटो वायरल झाले आहेत.