Virat Kohli’s 15 Years In International Cricket: गेली दीड शतक क्रिकेटच्या मैदानात कोणा एका खेळाडूचं नाव गाजलं असेल तर ते म्हणजे विराट कोहली. दिल्लीचं पोरगं ते क्रिकेटचा 'किंग कोहली' अशी ओळख निर्माण होण्यासाठी भरपूर मेहनत आणि सात्त्याची गरज असते. युवा खेळाडू टीम इंडियात जागा शोधत असताना आपला दर्जा टिकवून ठेवत ढीगभर धावा पारड्यात पाडणं, हे कोणा येड्या गबाळ्याचं काम नाही. पण विराट कोहलीने (Virat Kohli) फिटनेस आणि सात्त्याच्या जोरावर 15 वर्ष भारतीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. अशातच कोहलीच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीवर माजी क्रिकेटर सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठं वक्तव्य केलं आहे.


गेल्या 15 वर्षात विराट कोहली कसा बदलला? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीसोबत मी लहानपणी खेळलो आहे. मी त्याला तेव्हापासून पाहतोय. मला वाटलंच नव्हतं की विराट एवढा मोठा क्रिकेटर होईल, असं आकाश चोप्रा म्हणतो. त्यावेळी त्याने मुलाखत देणाऱ्या सुरेश रैनाला त्याच्या आठवणी आकाश चोप्राने विचारल्या. त्यावेळी रैनाने (Suresh Raina On Virat Kohli) मोठा खुलासा केला.


काय म्हणाला सुरेश रैना?


विराट बदलला तो, त्याच्या फिटनेसमुळे. त्याला माहित होतं की फिटनेस महत्त्वाची आहे. मला आठवतंय की, आम्ही जेव्हा 2008 साली ऑस्ट्रेलियाच्या टूरवर गेलो. आम्ही दोघं सोबत बसलो होतो. आम्ही इकोनॉमीमध्ये फ्लाई प्रवास करत होतो. त्यावेळी तो म्हणाला सुरेश भाई मला सुपरस्टार व्हायचंय. तो नेहमी आत्मविश्वासाने बोलायचा. त्याच्या मनात ते होतं. त्याची ज्याप्रकारे तयारी करायचा, त्यानुसार त्याच्यातील यंगस्टर काय मला दिसत होता. त्याची ट्रेनिंग करण्याची पद्धत वेगळी होती. विराटमध्ये आत्मविश्वास होता. मला उद्या शतक करायचंय आणि तो शतक करूनच बाहेर येयचा. दोन दिवस झाले नाहीत, तर पुन्हा एकदा शतक. श्रीलंका असो वा ऑस्ट्रेलिया, तो नेहमी म्हणायचा मला शतक करायचंय. मला वाटलं की, त्याच्यामध्ये थोडा अॅग्रेशन आहे, पण तो त्याच्या सबकॉन्शियस माईंडमध्ये ती गोष्ट फिट करत असायचा, असं सुरेश रैना सांगतो. 


पाहा Video



दरम्यान, अंडर 19 संघाचा विश्वविजेता कर्णधार म्हणून सुरू केलेला प्रवास अजूनही स्टार फलंदाजाच्या रूपात सुरू आहे. श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या विराटने घवघवीत यश प्राप्त केलं.  सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके ठोकण्याचा पराक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्यामुळे विराट कोहली खऱ्या अर्थाने क्रिकेटचा किंग ठरतोय, असं म्हटलं तर वावगं होणार नाही.