Virat Kohli Breaks Ricky Ponting’s Centuries Record: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जात असलेल्या शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली आहे. भारताचा सलामीवीर ईशान किशनने (Ishan Kishan) वादळी द्विशतक (Ishan Kishan quickest ODI double century) ठोकलं. त्यामुळे बांग्लादेशच्या स्टेडियममध्ये शुकशुकाट पहायला मिळतोय. ईशानच्या वादळापुढे विराटचं (Virat Kohli) शतक फिक्कं पडलं. मात्र, विराटचं कौतूक करावं तेवढं कमी ईशानला मोलाची साथ देत विराटने तब्बल 40 महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक (Virat Kohli Record) ठोकलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यातील शतकानंतर आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विराटने 72 शतक ठोकण्याचा (Virat Kohli 72th International Hundred) पराक्रम केला आहे. टेस्ट क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि वनडेमध्ये 72 शतक ठोकणारा विराट आता दुसरा खेळाडू बनला आहे. विराटने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पॉटिंगचा (Ricky Ponting) रेकॉर्ड मोडला. रिकीने त्याच्या कारकीर्दीत 71 शतक ठोकले होते. त्यानंतर या सामन्यात शतक ठोकत कोहलीने विराट (Virat Kohli Breaks Ricky Ponting’s Centuries Record) कामगिरी केली.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) भारताचा माजी स्टार खेळाडू सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर 100 शतकांचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीने झेप घेतली. त्यानंतर रिकी पॉटिंगचा 71 शतकांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्यानंतर 63 शतकांसह कुमार संगकारा (Kumar Sangakkara) येतो.


आणखी वाचा -  Virat Kohli : बादशाहत कायम! कोहलीचे 'विराट' शतक


दरम्यान, विराट कोहलीने बांग्लादेशविरुद्ध खेळलेल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेमध्ये 91 बॉलमध्ये 113 धावा केल्या. यामध्ये त्यानं 11 फोर आणि 2 गगनचुंबी षटकार देखील खेचले. तब्बल 3 वर्षानंतर विराट पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. तर दुसरीकडे सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ईशान किशनने (Ishan Kishan) सिलेक्टर्सला इम्प्रेस केलंय.