IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात गुरुवार 26 डिसेंबर पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. मेलबर्न येथे खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा त्याच्या मैदानातील वागणुकीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली (Virat Kohli) मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूंशी भिडला. सामन्यादरम्यान विराटने सॅम कोंस्टसला धक्का मारला ज्यामुळे त्याने वाद ओढवून घेतला आहे. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसी त्याच्यावर मोठी ऍक्शन घेऊ शकते. यासाठी विराट कोहलीवर बॅन किंवा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे. 


ICC विराटवर घेणार ऍक्शन? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर आयसीसी दोन प्रकारे कारवाई करू शकते. क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था मॅरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नुसार मैदानात एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूसोबत अयोग्य आणि जाणूनबुजून शारीरिक संपर्क करणे हा लेव्हल 2 चा गुन्हा आहे. हे MCC कायदा अध्याय 42.1 च्या अंतर्गत येतो. मैदानातील अंपायर या बाबतचा रिपोर्ट सामन्याच्या रेफरींकडे सुपूर्द करतील. मॅच रेफ्री याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. जर मॅच रेफरीला विराट कोहलीने सॅम कोंस्टसला जाणूनबुजून धक्का मारला याचे पुरावे मिळाले तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल. 


विराटला कोणती शिक्षा मिळणार? 


विराट कोहलीवर लेव्हल 2 च्या उल्लंघनासाठी 3 से 4 डिमेरिट पॉइंट दिले जातील. लेव्हल 2 चा उल्लंघन झाल्यास 3 डिमेरिट पॉइंटसाठी 50% ते  100% मॅच फी दंड म्हणून घेतली जाईल किंवा 1 निलंबन पॉइंट दिला जाऊ शकतो. जर मेलबर्न टेस्ट दरम्यान झालेल्या वादात विराट कोहली दोषी आढळल्यास त्याच्यावर वरील पैकी कारवाई केली जाऊ शकते. 


पाहा व्हिडीओ : 



हेही वाचा : माजी क्रिकेटरच्या वडिलांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?


एक टेस्ट किंवा 2 वनडे सामन्यांचा बॅन : 


डिमेरिट पॉइंट हे एका खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये 24 महिन्यापर्यंत राहतात. विराट कोहलीला 2019 मध्ये कोणताही डिमेरिट पॉईंट्स मिळाला नव्हता. जर मॅच रेफरी विराटला 4 डिमेरीट पॉईंट देतो तर त्यावर एक टेस्ट किंवा दोन वनडे सामन्यांचा बॅन लागू शकतो. याचा अर्थ विराट कोहली सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचव्या टेस्टला मुकू शकतो. विराटवर असे निर्बंध लावण्यात आल्यास भारतीय टीम प्रबंधन किंवा विराट कोहली याविरुद्ध अपील करू शकतात. 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला याने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या खांद्याला धक्का दिला होता. तेव्हा आयसीसीने कारवाई करून त्याला तीन डिमेरिट पॉइंट देण्यात आले होते. मात्र, अपील केल्यानंतर कागिसो रबाडाची शिक्षा रद्द करण्यात आली होती.