डरबन : भारतीय कॅप्टन विराट कोहलीसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली गेलेल्या एकदिवसीय मॅचमध्ये सहा विकेटनं मिळालेला विजय 'खास' आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेटवटच्या टेस्टमॅचमध्ये मिळालेल्या विजयाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी आपली टीम कटिबद्ध होती, असं विराटनं म्हटलंय.


अधिक वाचा : आता वन डेत टीम इंडिया नंबर १, दुसऱ्या सामन्यात राहावे लागेल अलर्ट


...म्हणून जिंकण्याची खात्री


या मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर विराटनं आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणत्याही सीरिजची पहिली मॅच महत्त्वाची असते. याचमुळे आम्ही जेव्हा प्रतिस्पर्धी टीमला २७० रन्सवर रोखलं तेव्हा आम्ही आनंदी होतो... यामुळे आम्ही मैदानावर उतरण्याआधीच 'जिंकणार' याची खात्री झाली होती, असं म्हणत विराटनं आपल्या टीमवरचा विश्वासही अधोरेखित केलाय.


अधिक वाचा : VIDEO : जबर गब्बर को घुस्सा आता है... धवन विराटवर भडकला...


टीमवर जबरदस्त विश्वास


अजिंक्य विश्वस्तरीय बॅटसमन आहे. त्यानं सुपरफास्ट बॉलर्सचा आत्मविश्वासानं सामना केला, असं म्हणत अजिंक्य राहाणेवर कौतुकाचा वर्षाव विराटनं केलाय. सोबतच, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यावरही कॅप्टननं विश्वास व्यक्त केलाय.


अधिक वाचा : IND VS SA : विराटने ऐकले नाही धोनीचे, रोहितचे ऐकून झाला पश्चाताप


भारत नंबर वनवर


भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने वन डे रँकिंगमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. तीन फॉर्मेटचा विचार करता भारताने टेस्ट आणि वन डेमध्ये क्रमांक १ पटकावला आहे. पण अजून टी -२० सामन्यात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.