VIDEO : जब गब्बर को घुस्सा आता है... धवन विराटवर भडकला...

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे.  या सामन्यात भारताच्या डावात शिखर धवन विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. त्यानंतर तो रनआऊटला जबाबदार असलेल्या कर्णधार विराट कोहलीवर जबरदस्त चिडला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 2, 2018, 06:53 PM IST
 VIDEO : जब गब्बर को घुस्सा आता है... धवन विराटवर भडकला...  title=

डरबन :  भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे.  या सामन्यात भारताच्या डावात शिखर धवन विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. त्यानंतर तो रनआऊटला जबाबदार असलेल्या कर्णधार विराट कोहलीवर जबरदस्त चिडला. 

यामुळे शिखर भडकला

या सामन्यात चांगल्या लयीत खेळणारा शिखर धवन कर्णधार विराट कोहलीच्या चुकीच्या कॉलमुळे रन आऊट झाला. त्यानंतर त्याला आपला संताप लपवता आला नाही. ज्या ठिकाणी धाव नाही अशा वेळी धाव घेण्याचा विराटचा प्रयत्न फसला आणि त्याचा भुर्दंड शिखरला भोगावा लागला. त्यामुळे बाद झाल्यावर तो चांगला भडकला. 

डेसिंगरूममध्ये दाखवला संताप

या सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यावर शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने चेंडून सीमापार धाडत होता. त्याने २९ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. पण विराटच्या चुकीमुळे तो बाद झाला. एरवी हसतमुख असलेला गब्बर शिखर धवन तंबूत जाताना चिडलेला होता. तसेच तो ड्रेसिंगरूममध्ये बसला होता तेव्हाही संजय बांगरशी बोलताना त्याचा संताप त्याच्या देहबोलीवरून दिसून येत होता.