नवी दिल्ली : टेस्ट सिरीजमध्ये १-२ अशी मात खाल्ल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने वन डे रँकिंगमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या शानदार ११२ धावांच्या खेळीसह इतर खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे.
कर्णधार विराट कोहली शिवाय अजिंक्य राहणे याने ७९ धावांची खेळी केली. त्यापूर्वी कुलदीप यादव ३ आणि युजवेंदर चहल २ विकेट घेतल्या. या विजयामुळे भारताने आयसीसी वन डे रँकिंगमध्ये पहिले स्थान प्राप्त केले. यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ क्रमांक एकवर होता. आता टीम इंडिया टेस्टसह वन डेमध्येही क्रमांक एकचा संघ बनला आहे.
तीन फॉर्मेटचा विचार करता भारताने टेस्ट आणि वन डेमध्ये क्रमांक १ पटकावला आहे. पण अजून टी -२० सामन्यात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम इंडिया या विजयामुळे क्रमांक एकवर गेली आहे पण त्यांना पुढच्या सामन्यात यावर लक्ष देणे गरजेचे आहे. पुढील सामन्यात पराभव झाला तर पुन्हा भारत क्रमांक दोनवर फेकला जाण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केवळ काही अंकाचा फरक आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा ६ विकेट्सनं दणदणीत विजय झाला आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीनं शतक झळकवलं. विराटचं कारकिर्दीमधलं हे ३३वं शतक होतं. तर अजिंक्य रहाणेनंही त्याला चांगली साथ दिली. रहाणेनं ८६ बॉल्समध्ये ७९ रन्सची खेळी केली. रहाणेच्या या खेळीमध्ये ५ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहलीनं ११९ बॉल्समध्ये ११२ रन्स केल्या. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २७० रन्सचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या रुपात दोन धक्के लागले. रोहित शर्मा २० रन्सवर तर शिखर धवन ३५ रन्सवर आऊट झाला. मॉर्नी मॉर्कलनं रोहितची विकेट घेतली तर शिखर धवन रन आऊट झाला.
कॅप्टन फॅप डुप्लेसिसनं लगावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या वनडेमध्ये सावरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं ५० ओव्हर्समध्ये २६९/८ एवढा स्कोअर केला. डुप्लेसिसनं ११२ बॉल्समध्ये १२० रन्स केल्या. डुप्लेसिसच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता.
टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीपासूनच धक्के लागले. पण डुप्लेसिसनं पहिले क्विटन डीकॉक(३४), क्रिस मॉरिस(३७) आणि पेहलुक्वायोच्या मदतीनं दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. एकवेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था १३४-५ अशी होती. भारताकडून कुलदीप यादवनं ३, युजवेंद्र चहलनं २ आणि बुमराह-भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.