IndvsPak Asia Cup 2022 : आशियाई क्रिकेटच्या महाकुंभाला सुरूवात झाली आहे. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट सामने या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच पाकिस्तानचा स्पीनर शादाब खानने कोहलीने या स्पर्धेमध्ये शतक ठोकावं, अशी माझी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने गेल्या तीन वर्षांपासून एकही शतक ठोकलेलं नाही. या स्पर्धेदरम्यान त्याने शतक करावं अशी माझी इच्छा आहे.  मात्र त्याने हे शतक पाकिस्तानविरोधात नाही करावं, असं शादाब खान म्हणाला. शाहीनची दुखापत हा आमच्या संघासाठी मोठा धक्का आहे. पण जे काही घडलंय त्याला तुम्ही काही करू शकत नाहीत. मात्र तरीही आम्हाला शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीमची उणीव भासेल, असं शादाबने म्हटलं आहे.


गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवाची सल प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. आजच्या सामन्यामध्ये संघाचं नेतृत्त्व रोहित शर्मा करणार आहे. भारताचा हुकमी गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराहची उणीव भारतीय संघाला भासणार आहे. 


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंह.