विराट कोहलीच्या रॉकेट शॉटने मोडली स्टेडियमची भिंत, जोरदार सिक्स पाहून प्रेक्षक हैराण
सरावादरम्यान विराट कोहलीने रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भिंतीला भोक पडले. बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यासाठी विराट फलंदाजीचा सराव करत होता.
Virat Kohli wall breaking shot : Virat Kohli wall breaking shot : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून यातील पहिला सामना हा 19 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ सरावा करता येथे पोहोचला आहे. रोहित शर्मा विराट कोहली सारखे दिग्गज बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये धूळ चारण्यासाठी सरावा दरम्यान घाम गाळत असून विराट कोहलीने या दरम्यान ठोकलेल्या एका सिक्समुळे स्टेडियमच्या भिंतीला भोक पडल्याचे पाहायला मिळाले.
विराटचा रॉकेट शॉट :
सरावादरम्यान विराट कोहलीने रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील भिंतीला भोक पडले. बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यासाठी विराट फलंदाजीचा सराव करत होता. त्याच्या बॅटमधून एकापेक्षा एक शॉट निघत होते. मात्र याचवेळी विराटच्या बॅटमधून निघालेला एक दमदार शॉट थेट स्टेडियमवरील ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेला आणि जवळील भिंतीला जाऊन आदळला. विराटने मारलेला हा सिक्स इतका जोरदार होता की ड्रेसिंग रूम जवळील भिंतीला भोक पडून तो बॉल पार गेला. विराट कोहली जवळपास अनेक महिन्यांनी टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी उतरणार आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सिरीज टीम इंडियाने खेळली होती, परंतु विराटने वैयक्तिक कारणामुळे यातून माघार घेतली होती.
कसा आहे भारत- बांगलादेशचा टेस्ट रेकॉर्ड :
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये बांगलादेश एकही सीरिज जिंकू शकलेली नाही. असं असलं तरी टीम इंडिया बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. कारण बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानला त्यांच्याच होम ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमध्ये पराभूत केलं आहे. बांगलादेशने पाकिस्तानला टेस्ट सिरीजमध्ये 2-0 च्या फरकाने पराभूत केले.
हेही वाचा : मोडलेल्या हाताने डायमंड लीग फायनल खेळला नीरज चोप्रा, पोस्टद्वारे केला खुलासा
भारताचं लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल :
2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळवली जाणार आहे. भारताचं लक्ष या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलच तिकीट पक्क करण्यावर असणारे. बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिजनंतर टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया सोबत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये उत्तम परफॉर्मकडून जिंकण्यासाठी टीम इंडियाचं प्रयत्न करेल.