कोलकाता : भारत विरूद्ध श्रीलंकेच्या टेस्ट सामन्यातील आजचा पहिला दिवस.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाचा फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन कॅप्टन विराट कोहलीने उत्तम खेळ दाखवला.  विराट कोहलीने जोरदार छक्का लगावून आपल्या टेस्ट करिअरमधील १८ वे शतक पूर्ण केले आहे. भारतीय संघाने ८ विकेट गमावून ३५२ धावा केल्या आहे. आता श्रीलंकेसमोर जिंकण्यासाठी २३१ धावांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. 


दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाने ३५२ धावा केल्या. कोलकाताच्या या टेस्टमॅचमध्ये काही रोमांच आणण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाने श्रीलंका टीमसमोर जिंकण्यासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 


विराट कोहलीचे १८ वे शतक


विराटने ईडन गार्डनवर उत्तम खेळ दाखवत नाबाद १०४ धावा केल्या. या दरम्याने त्याने ११९ चेंडूंचा सामना करत १२ फोर आणि २ सिक्स लगावले. दुसऱ्या इनिंगमध्ये विराटसोबतच शिखर धवन ने ९४ धावा तर के एल राहुलने ७९ धावांचे योगदान दिले. कोहलीसोबत नो शमी १२ धावा करून नाबाद राहिला. मॅचमध्ये भारतीय टिम पहिल्यांदा १७२ धावा करून आऊट झाली. आणि श्रीलंकेच्या संघाने २९४ धावा केल्या. पहिल्या इनिंगच्या आधारावर श्रीलंका टिमने १२२ धावांची सर्वात मोठी बढत कमावली. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय संघाने बाजी मारली. आणि विराट कोहलीने आपल्या संपूर्ण धावांमध्ये वाढ केली.