IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिकेला (Border-Gavaskar Trophy) 9 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांनी सज्ज असल्याचं पहायला मिळतंय. त्याचबरोबर दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी मैदानात घाम गाळत असल्याचं दिसतंय. अशातच आता टीम इंडियाच्या किंग कोहलीचा (Virat Kohli Video) एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता विराट कोहली कांगारूंचा (Australia) खेळ खल्लास करणार असल्याचं दिसतंय. (Virat Kohli Video goes viral before India vs Australia 1st Test Border-Gavaskar Trophy latest sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ  (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाला चिंता लागली ती विराट कोहली (Virat Kohli) आणि आर आश्विनची (R Ashwin). आश्विनसाठी त्यांनी डुब्लिकेट आश्विन म्हणजेच महेश पिथिया (Mahesh Pithia) तर शोधलाय. दुसरा विराट शोधणार तरी कसा. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चिंता लागली ती, विराट कोहलीची.


आणखी वाचा - Mahesh Pithiya: 'डुप्लिकेट अश्विन'ने Australian फलंदाजांना फोडला घाम, Steve Smith क्लीन बोल्ड; बॉलच खेळता येईना


एकीकडे कांगारू संघ विराटला घाबरला असला तरी विराट मात्र तयारी करताना दिसतोय. विराट कोहली हा सध्या जीममध्ये घाम गाळत असून त्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. र्क आउट करतानाचा व्हिडीओ विराटने शेअर केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला घाम फुटलाय.


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)


दरम्यान, पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. फलंदाज श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे.  त्यामुळे आता अय्यरच्या जागेवर भारताला विश्वासू खेळाडू मिळणार की नाही, याची चिंता कॅप्टनला सतावत आहे.


ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया (India’s squad for first 2 Tests vs Australia) - 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.