मुंबई: क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंसोबत अनेक किस्से होत असतात. अगदी मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही खेळाडू अनेक गमती-जमती करत असतात. विरेंद्र सेहवागबद्दल तर अनेक किस्से फेमस आहेत. खेळत असताना भजन आणि गाणं म्हणायची सवय असो किंवा सतत तुफान फलंदाजी करण्याची सवय असो. सध्या सेहवाग सोशल मीडियावर खूप अॅक्टीवर आहे. सतत त्याच्या पोस्टमुळे त्याने मांडलेल्या मतांमुळे तो चर्चेत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे माजी ओपनर विरेंद्र सेहवागने एक अजब किस्सा सांगितला होता. कपिल शर्मा शो दरम्यान सासरवाडीत घडलेला प्रसंग आणि तिथल्या गमतीजमती त्याने शेअर केल्या. 300 धावा केल्यानंतर सासच्या लोकांनी छाती गर्वाने आणि अभिमानाने फुलत असेल. असं जेव्हा कपिलने विचारलं तेव्हा सेहवागनं एक किस्सा शेअर केला. 


विरेंद्र सेहवाग लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा सासरी गेला होता तेव्हा त्याला भेटण्यासाठी जवळपास 10 हजारपेक्षा जास्त लोक जमले होते. 'तो सगळा प्रकार पाहून मी त्या क्षणी ठरवलं की पुन्हा सासरवाडीला येणार नाही.' 


शोएब मलिकचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर गंभीर आरोप


'सासरी जमलेली एवढी गर्दी कमी व्हायचं नाव घेत नव्हती. मला तिथून बाहेर पडण्यासाठी शेवटी पोलीस बोलवायची वेळ आली. त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं आणि मला तिथून बाहेर काढलं. त्या दिवसापासून पुन्हा सासरी जायचं नाही हे मनाशी पक्क केलं. गर्दी एवढी जमली होती की तिथून बाहेर पडणंही अवघड झालं होतं.' हा किस्सा सेहवागच्या आयुष्यातला न विसरता येणाऱ्या घटनांपैकी एक आहे.