शोएब मलिकचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर गंभीर आरोप

 पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: May 16, 2021, 08:39 AM IST
शोएब मलिकचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर गंभीर आरोप title=

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंची निवड कशा पद्धतीनं करतं हे सांगताना त्याने हे आरोप केले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पूर्वग्रहदूषित आणि खेळाडूंची उत्तम कामगिरी पाहून नाही तर ओळखीवर सेटिंग करून निवड करतं. 

झिम्बाब्वे इथे नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेसाठी पीसीबी निवड समितीने कर्णधार बाबर आझमने केलेल्या निवडीबाबतच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यावर मलिकने ही टीका केली. हरारे येथे झालेल्या या मालिकेत पाकिस्तानने 2-0 असा विजय दणदणीत मिळवला होता. 

मलिक याने पाक पॅशन डॉट नेटला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा आरोप केला. आपल्याला क्रिकेट या खेळातही आवड-नावड हा प्रकार असतो. पण पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड एक अशी जागा आहे जिथे कौशल्यावर भर दिला जात नाही. तो दिला तर खूप गोष्टी सुधारतील असंही मलिका यावेळी म्हणाला आहे. 

खेळाडूंची निवड ही त्यांची योग्यता आणि कौशल्याच्या आधारावर करायला हवी. तर कर्णधार आझमला त्याची टीम निवडण्याचं स्वतंत्र्यही द्यायला हवं. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसं करत नाही अशी टीका मलिकने केली आहे. 

भारतात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान 9 शहरांमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारतात क्रिकेट खेळण्यासाठी येण्याची परवानगी देखील पाकिस्तानी संघाला मिळाली आहे.