मुंबई : टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात सुरु असलेला पाचवा शेवटचा कसोटी सामना विविध कारणामुळे चर्चेत आहे. बुमराहची बॅटींग, स्टूअर्ट ब्रॉडची सर्वाधिक धावा देणारी गोलंदाजी, बेअरस्ट्रोचं शतक, विराटची स्लेजिंग या अशा अनेक विविध कारणामुळे ही टेस्ट चर्चेत आहे. त्यात आता आणखीण एक घटना घडली ज्यामध्ये विराटवर भारताच्या माजी क्रिकेटपटूने कॉमेंट्री करताना टीका केली आहे. या टीकेनंतर आता विराटचे चाहते चांगलेच भडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एजबॅस्टन कसोटी रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ पार पडला. या सामन्याची कॉमेंट्री करताना विराट कोहलीबाबत (Virat Kohli) वीरेंद्र सेहवाग (virendra sehwag) अभद्रच बरळला. मॅच दरम्यान विराट कोहली स्लिपमध्ये उभा असताना डान्स करताना दिसला. यावर सेहवागच्या तोंडून विराटसाठी 'छमिया' हा शब्द निघाला. सेहवागच्या या टीकेमुळे आता विराटचे चाहत्यांनी सेहवागवर निषाणा साधालाय सुरुवात केली आहे.


व्हिडिओत काय? 
विराट कोहली दोन्ही हात वर करून नाचताना दिसत आहे. त्याच्या डान्सवर टिप्पणी करताना मोहम्मद कैफ म्हणतो की आता विराट कोहलीला बघा, आणि त्या दरम्यानचं सेहवाग म्हणतो, 'छमिया तिथे नाचतोय'. सेहवागने केलेल्या या कमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  


दरम्यन सेहवागची ही टीका विराटच्या चाहत्यांना रुचली नाही आहे. विराटच्या चाहत्यांनी सेहवागवर टीका करायला सुरुवात केली आहे.सेहवागच्या या कमेंटवरून सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला आहे. काही क्रिकेट चाहते हिंदी कॉमेंट्री दिवसेंदिवस कचरा बनत असल्याचा दावा करत आहेत, तर काही जण सेहवागला कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणी करत आहेत.


स्कोरबोर्ड
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 3 गडी गमावून 125 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाची एकूण आघाडी 257 धावांची झाली आहे. सध्या चेतेश्वर पुजारा (50) आणि ऋषभ पंत (30) क्रीजवर आहेत.