मुंबईत विरूष्का च्या रिसेप्शन सोहळ्याला सुरूवात
इटलीमध्ये लग्नात अगदी इंग्लिश पिंक रंगाचा लेंहगा घातलेली अनुष्का दिल्लीच्या रिसेप्शनमध्ये अस्सल भारतीय अवतारामध्ये दिसली होती. मात्र आज मुंबईत आयोजित रिसेप्शन पार्टीमध्ये अनुष्का शर्मा इंडो वेस्टर्न लूक मध्ये दिसली आहे.
मुंबई : इटलीमध्ये लग्नात अगदी इंग्लिश पिंक रंगाचा लेंहगा घातलेली अनुष्का दिल्लीच्या रिसेप्शनमध्ये अस्सल भारतीय अवतारामध्ये दिसली होती. मात्र आज मुंबईत आयोजित रिसेप्शन पार्टीमध्ये अनुष्का शर्मा इंडो वेस्टर्न लूक मध्ये दिसली आहे.
विरूष्काचा खास पेहराव
विराट कोहली मुंबईतील रिसेप्शन पार्टीमध्ये निळ्या रंगाच्या वेलव्हेट कुर्ता आणि पायजमामध्ये दिसला तर गोल्डन रंगाच्या आऊटफीटमध्ये अनुष्का शर्मा अगदीच सुरेख दिसत आहे.
मुंबईत पार्टीला सुरूवात
मुंबईमध्ये लोअर परेल भागात 'हाई राईज' मध्ये विरूष्काच्या लग्नाचे रिसेप्शन रंगणार आहे. नवव्या मजल्यावर 'एस्टर बालरूम' मध्ये पार्टी आयोजित करण्यात आली आहे. इटलीमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये विरूष्काचे लाग्न पार पडले. त्यानंतर भारतातील रिसेप्शन सोहळ्यात विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या जवळील नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी होणार आहे.
सेलिब्रिटींची हजेरी
विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला सुमारे ६०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईतील रिसेप्शनला अभिनेता बोमन इराणी, संदीप पाटील सपत्निक पोहचले आहेत. सोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे पोहचले आहेत.
विरूष्काने शाहरूख खान, आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही आमंत्रित केले आहे.