IND v AUS: DRS पाहून Virat चा वाढला पारा, स्टंप माईकमध्ये आवाज कैद; पाहा Video
IND v AUS 4th Test: बॅटिंगनंतर आता फिल्डिंगमध्ये देखील विराट कोहलीचं आक्रमक रूप पहायला मिळालं. आश्विनच्या बॉलवर ज्यावेळी फलंदाज बाद झाल्याची अपील झाली आणि DRS तपासण्यात आला, तेव्हा विराटचा पारा चढल्याचं पहायला मिळालं.
Virat kohli Nitin Menon Video: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat kohli) याच्या शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या (IND v AUS 4th Test) आणि शेवटच्या कसोटीत मोलाची लीड घेतली होती. भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या आणि 91 धावांची आघाडी घेतली आहे. असं असलं तरी सामना ड्रॉच्या दिशेने जात असल्याचं पहायला मिळतंय. मात्र, सामन्यात कोहलीच्या विराट खेळीमुळे टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलचं (WTC Final 2023) मिळवलंय. त्यामुळे आता विराटवर चाहते भलतेच खुश असल्याचं पहायला मिळतंय. अशातच किंग कोहलीचा एक व्हिडिओ (Virat kohli Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं पहायला मिळतंय.
ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यासाठी रोहित शर्माने (Rohit Sharma) फिरकीचा मारा सुरू केला. एकीकडे आश्विन (R Ashwin) आपल्या बॉलिंगने आग ओकण्यास सुरूवात केली. तर, दुसरीकडे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेलने (Akshar Patel) राईटी बॅटर्सला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केलाय. ऑस्ट्रेलियाला झटपट बाद करून सामना खिश्यात घालण्याची तयारी रोहितने सुरू केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला झटपट 8 विकेट घ्यावे लागणार आहेत.
नेमकं काय घडलं?
आश्विनने पूर्ण अनुभवाचा फायदा उचलत बॉलिंगला सुरूवात केली. भारतीय गोलंदाज हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी फिल्डर देखील जोरदार अपिल करत असल्याचं दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 34 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने कांगारू फलंदाजाला क्रीझमधून हेड वाइड आणि राऊंड द विकेट बॉल टाकला. ज्यावर फलंदाज पूर्णपणे चुकला आणि अश्विनचा हा चेंडू थेट डोक्याच्या लाईनमधून पॅडवर गेला.
आणखी वाचा - Virat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी?
अश्विनचा बॉल सरळ बॅटरच्या पॅडवर गेला पण अंपायरने आऊट दिला नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू आक्रमक झाले. विराटने देखील आपल्या अंदाजात अंपायर नितिन मेनन (Umpire Nitin Menon) यांच्याशी शाब्दिक वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, हास्यमय वातावरणात हा सर्व प्रकार घडला.
पाहा Video -
दरम्यान, ज्यानंतर विराट कोहली मैदानावरील पंचांच्या (Umpire) निर्णयावर चांगलाच संतापलेला दिसत आहे. त्यानंतर तो 'मी अंपायर असतो तर मी आउट दिलं असतं' असं म्हणताना ऐकायला मिळत आहे. त्यांचं संभाषण स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं होतं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) व्हायरल होत आहे. अनेकांनी विराटवर टीका देखील केल्याचं पहायला मिळतंय.