नवी दिल्ली : भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या मालिकेनिमित्तानं देशाबाहेर असतानाच महिला संघही परदेशात भारताची पताका उंचावेल अशी कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तिथं 7 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय महिला संघानं एक कसोटी सामना खेळला जो अनिर्णित राहिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी सामना अनिर्णित राहिला, ज्यानंतर सुरु झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये मात्र भारतीय खेळाडूंच्या हाती निराशाच आली आहे. सध्या भारतीय संघ या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर आहे. संघाच्या वाट्याला येणारं अपयश पाठ सोडत नसलं तरीही सध्या एका 17 वर्षीय खेळाडूची बरीच चर्चा सुरु आहे. 


ही खेळाडू आहे शेफाली वर्मा. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा 5 विकेटनं पराभव झाला खरा. पण, या सामन्यामध्ये संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिनं असं काही केलं, की क्रीडारसिकांना 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनी याचीच आठवण झाली. 


Video : युजवेंद्र चहलच्या पत्नीची अदाकारी पाहून नेटकरी म्हणतात 'लय भारी'


 


17 व्या षटकामध्ये एका चेंडूवर शेफालीनं पुढे येत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, तिला मनाजोगा शॉट मारता आला नाही. तिचा शॉट हुकला आणि स्टम्पच्या मागं असणाऱ्या यष्टीरक्षकाकडून तिला स्टम्पिंगवर बाद करण्यात आलं. 




शेफाली बाद झाली असली तरीही तिनं विकेट वाचवण्यासाठी म्हणून चांगलाच प्रयत्न केला. धोनीप्रमाणंच तिनं फुल स्ट्रेच करत मागे येण्याचा जोरदार प्रयत्न केला. धोनीनं फुल स्ट्रेच करत विकेट वाचवला होता. पण, शेफाली मात्र असं करु शकली नाही. असं असलं तरीही तिचा हा अंदाज मात्र सर्वांना माहिचीच आठवण करुन गेला हेही तितकंच खरं.