MS Dhoni: तेव्हा कॅप्टन धोनी गंभीरला काय म्हणाला होता? 11 वर्षानंतर केला खुलासा!
ICC World Cup Final 2011 : गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली.
Gautam Gambhir Statement on MS Dhoni : टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) ज्यावेळी लखनऊ सुपर जायन्टचा कोच झाला, त्यानंतर गंभीरचं क्रिडाविश्वातील वजन आणखी वाढलेलं दिसतंय. गंभीरला कॅप्टनसीची संधी दिली गेली नाही, अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि गंभीरमध्ये वाकडं असल्याच्या चर्चा होत असतात. मात्र, यावर दोघांनी नेहमी खंडन केलंय. अशातच आता गौतम गंभीरने धोनीवर मोठं वक्तव्य केलं आहे. (What would Captain MS Dhoni have said to Gautam Gambhir in 2011 World Cup Final revealed after years marathi news)
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 साली ICC World Cup Final मध्ये दणक्यात विजय नोंदवला. अखेरच्या सामन्यात श्रीलंका धुळ चारत भारताने (IND vs SL Final) वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या सामन्यात गौतम गंभीरने 97 धावांची संयमी खेळी केली होती. एकीकडे सचिन, सेहवाग, कोहली बाद होत असताना गौतम मैदानात पाय रोवून उभा राहिला. कोहली (Virat kohli) बाद झाल्यानंतर धोनीने मैदानात एन्ट्री मारली.
धोनी मैदानात आल्यानंतर दोघांनी सामना खेचून नेला. त्यावेळी धोनी आणि गंभीरमध्ये सातत्याने चर्चा होत होती. धोनी वेळोवेळी गंभीरला सल्ले देताना दिसला. त्यामुळे धोनी गंभीरला नेमकं काय म्हणाला होता, असा सवाल आजही विचारला जातो. त्यावर आता गंभीरने उत्तर दिलंय.
काय म्हणाला गंभीर?
एमएस धोनीने मला खूप सपोर्ट केला कारण, मी शतक (Century) पुर्ण करावं, अशी धोनीची इच्छा होती. मी शतक करावं अशी त्याची नेहमीच इच्छा होती, त्यानं मला ओव्हरच्या मध्ये शतक कर, वेळ काढा आणि घाई करू नको, असं सांगितलं. गरज पडल्यास मी जोखीम पत्करेन आणि झटपट धावा करण्याचा करेन, असं धोनीने मला सांगितलं होतं, असं गंभीर (Gautam Gambhir On MS Dhoni) म्हणाला आहे.
आणखी वाचा - India vs Sri Lanka : पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट क्लीन बोल्ड, पाहा Video
दरम्यान, गंभीरने एक बाजू संभाळून ठेवली आणि धोनीने दुसऱ्या बाजूने दांडपट्टा सुरू ठेवला. त्यामुळे टीम इंडियाला ऐतिहासिक विजय (Ind Win WC2011) नोंदवता आला. गंभीर 97 वर खेळत असताना थिसारा परेराच्या एका गुड लेन्थ बॉलवर गंभीर क्लिन बोल्ड झाला होता. त्यामुळे त्याचं शतक हुकलं. धोनीने देखील 91 धावांची तातडीची खेळी केली होती. त्यामुळे धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. गंभीरने जास्त धावा केल्या तरीही धोनीला किताब देण्यात आल्याने क्रिडाविश्वात चर्चाला उधाण आलं होतं.