India vs Sri Lanka : पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट क्लीन बोल्ड, पाहा Video

टीम इंडियाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना 215 धावांवर आटोपला. विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Jan 12, 2023, 10:58 PM IST
India vs Sri Lanka : पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट क्लीन बोल्ड, पाहा Video  title=

Ind vs Sl : टीम इंडियाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना  215 धावांवर आटोपला. भारताकडून के. एल. राहुल नाबाद 64 धावा करत विजयाचा हिरो ठरला. भारताला सलामीला आलेले रोहित शर्मा आणि शुभमन गिल लवकर बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीलाही बोल्ड आऊट करत श्रीलंकेने दबाव टाकला होता. मात्र राहुलने मैदानावर तळ ठोकत 44 व्या ओव्हरमध्ये संघाच्या 216 धावा पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र मागील सामन्यामधील शतकवीर विराट कोहली अवघ्या 4 धावांवर परतला. (Virat Kohli clean bowled in the Ind vs Sl 2nd ODI Match viral Video latets marathi sport news)

विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोहली पूर्णपणे फसला कारण बोल्ड आऊट झाल्यावर कोहलीही शॉक झालेला दिसला. कोहलीला बाद करणाऱ्या लाहिरू कुमाराने जोरदार सेलिब्रेशन केलं. लक्ष्याचा पाठलाग करताना आणखी एका शतकाला गवसणी घालणार असं सर्वांना वाटत होतं. मात्र कुमाराने कोहलीला बाद करत टीम इंडियाला धक्का दिला.  

कोहलीने गुवाहाटी येथे 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 12 चौकार आणि 1 षटकार खेचला होता. कोहलीचं एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक होते. त्यामुळे दुसऱ्या चाहत्यांना  सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना चेज मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीकडून 46 व्या शतकाची आशा होती. 

 

दरम्यान, रोहित शर्मा 17, शुभमन गिल 21, विराट कोहली 4 आणि श्रेअस अय्यर 28 धावांवर बाद झाले. विकेट्स जात असल्याने टीम इंडिया दबावात होती. राहुलने हार्दिक पंड्या 36, अक्षर पटेल 21 आणि कुलदीप यादव नाबाद 10 यांच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला.