इस्लामाबाद : पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे खेळाडू अनेकदा त्यांच्या वागण्यामुळे किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काही वेळेला पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी विचार न करता असे काही वक्तव्य देखील केलं आहे, ज्यामुळे  जगभर वाद निर्माण झाला आहे. आता ही पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक आई-वडिल आपल्या लहान मुलांना चांगली वागणूक देण्यासाठी त्यांनी जर काही चूक केली तर त्यांना रागवतात, ओरडतात किंवा काही पालक त्यांना मारतात देखील.


अशीच एक गोष्ट शाहिद आफ्रिदीच्या मुलीने केली, जी त्याला आवडली नाही म्हणून त्याने त्याच्या राग आपल्या टीव्हीवर काढला.


परंतु त्याला जी गोष्ट आवडली नाही ती खरीतर विवादात्मक गोष्ट ठरु शकते.


आफ्रिदीला ही गोष्ट आवडली नाही


खरं तर, पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एकदा एका मुलाखतीत खुलासा केला की, त्याने आपली मुलगी आरती करत असल्यामुळे त्याने त्याच्या घरचा टीव्ही तोडला.


शाहिदला जेव्हा एका टीव्ही अँकरने विचारले की, त्याने कधी रागाच्या भरात टीव्ही तोडला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आफ्रिदी म्हणाला की, हो त्याने एकदा असे केले आहे. त्याने सांगितले की ,जेव्हा त्याने आपल्या मुलीला टीव्ही सीरियलमध्ये आरतीचे अनुकरण करताना पाहिले, तेव्हा त्याला राग आला ज्यामुळे त्याने हे केलं.


या घटनेचे वर्णन करताना आफ्रिदी म्हणाला की, खरे तर हे सर्व त्याच्या पत्नीमुळे घडले. त्याने सांगितले की, त्यावेळेस टीव्हीवर खूप वेगवेगळे डेली सोप सुरू होते. माझी पत्नी तशी जास्त टीव्ही बघत नव्हती, परंतु तिला ही मालिका आवडायची.


पुढे आफ्रिदीने म्हणाला की, "मी तिला अनेक वेळा सांगितले की, असे डेलीसोप मुलांसोबत बघत नको जाऊस, तू एकटीने पाहा" परंतु ती मालिका पाहूनच त्याच्या मुली असं करु लागल्या असे आफ्रिदीचे म्हणने आहे.


आफ्रिदीने सांगितले की त्याने पाहिले की, त्याची एक मुलगी, ती अंशा होती की अक्शा हे त्याला निट आठवत नाही, परंतु ती अशीच मालिका पाहिल्यानंतर तिचे हात फिरवत होते आणि आरती करत होती. ज्यामुळे आफ्रिदीला पाहून राग आला आणि त्याने घरातील टीव्ही फोडला.



शाहिद अफ्रिदीचे हे वक्तव्य वादग्रस्त ठरले, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या या वक्तव्यावर कडाडून टीका होत आहे आणि काही भारती त्याला ट्रोल देखील करु लागले आहेत.