मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी 18 खेळाडूंच्या भारतीय संघाची (Team India) घोषणा BCCI ने काल केली. आयपीएलमध्ये (IPL 2022) छाप उमटवणाऱ्या युवा खेळाडूंना या संघात संधी देण्यात आली आहे. तर चांगल्या कामगिरीनंतरही काही खेळाडूंना टीमबाहेर बसवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघात संधी न मिळालेल्या खेळाडूंपैकीच एक नाव म्हणजे संजू सॅमसन (sanju samson). राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार सॅमसनचं नाव संघात नसल्यामुळे भारतातील क्रिकेट चाहत्यांनी BCCI ला ट्विटरवर चांगलंच ट्रोल केलं आहे. संजू सॅमसन कुठे आहे? असा सवाल क्रिकेट चाहते BCCI ला हशटॅग करत विचारत आहेत. 


राहुल त्रिपाठीचीदेखील निवड न झाल्याबद्दल फॅन्स सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. या दोन क्रिकेटपटूंना वगळण्यात आल्याबद्दल नाराज झालेल्या चाहते ट्विटरवर आपली निराशा व्यक्त करत आहेत. 


सॅमसनची जुनी मुलाखत व्हायरल
तर दुसरीकडे अलीकडील झालेल्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या गौरव कपूरच्या मुलाखतीमधील सॅमसनच्या मुलाखतीचा काही भागही व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये सॅमसन म्हणतो की, “मला खेळायला मिळाले तर मी खेळतो. जर नाही खेळायला मिळाले तर नाही खेळत. मी इथे खूप धावा करण्यासाठी आलेलो नाही. मी इथे खूप कमी धावा करण्यासाठी आलो आहे जे संघासाठी खूप उपयुक्त ठरतील." या मुलाखतीमध्ये सॅमसनने राहुल द्रविड आणि इतर काही दिग्गज क्रिकेटपटूंशी झालेल्या संवादांबद्दलही सांगितलं होतं. 


सॅमसन, राहुल त्रिपाठी टी-ट्वेन्टी सेटअपचा भाग
सॅमसन आणि त्रिपाठीला संघाबाहेर ठेवल्यामुळे चाहते चांगलेच नाराज आहेत. राहुल त्रिपाठी हा आयपीएलमध्ये गेल्या काही सीझनमध्ये सातत्यपूर्ण धावा करणारा खेळाडू आहे. सिनिअर्सना विश्रांती दिली असताना राहुल त्रिपाठी हा योग्य पर्याय असून तो पात्र असल्याचे फॅन्सचे म्हणणे आहे. तर राहुल त्रिपाठीनंतर संजू सॅमसन हा दुसरा क्रिकेटपटू सिलेक्शनसाठी पात्र ठरत असल्याचे ट्विट एका चाहत्याने केलं आहे. 


राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन दोघेही T20 सेटअपचा भाग होण्यास पात्र आहेत. दोघांनीही गेल्या दोन आयपीएलमध्ये चांगल्या स्ट्राइक रेटसह धाव केल्या असून त्यांच्या कामगिरीतही सातत्य आहे. आता आशा आहे किमान दोघांचीही निवड आयर्लंडविरिद्धच्या T20 मालिकेसाठी केली जाईल असं ट्विट एका फॅन्सने केलं आहे.