Rinku Singh Life Story: सामन्याचं अखेरचं षटक... संपूर्ण जबाबदारी नवख्या तरुणाच्या खांद्यावर. पाच फूट पाच इंच उंचीच्या रिंकू सिंह (Rinku Singh) याने सलग पाच चेंडूवर पाच षटकार खेचले आणि गुजरातच्या (GT vs KKR) मैदानावर एकच कल्ला सुरू झाला. कॅप्टन राणाचे पाय थांबले नाहीत. धावत मैदानात जाऊन त्याने रिंकूला कडकडून मिठी मारली. एवघ्या एका ओव्हरमध्ये रिंकू हिरो ठरलाय. मात्र, रिंकूच्या संघर्षाची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिंकू सिंगच्या संघर्षाची कहाणी (Rinku Singh Life Story) कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाही. रिंकू सिंग उत्तर प्रदेशमधील (UP) एका सामान्य कुटुंबातून येतो.12 ऑक्टोबर 1997 रोजी यूपीच्या अलीगड जिल्ह्यात झाला. रिंकू सिंगच्या आई वडिलांना एकूण 5 आपत्य.. त्यामधून रिंकू सिंग हे त्यांचा तिसरा मुलगा. रिंकूचे वडील हे गॅस डिलिव्हरीचे काम करायचे, पण येवढ्या मोठया कुटुंबाला सांभाळणं कठीण जात होतं. घरची परिस्तिथी बिकट होती त्यामुळे क्रिकेटर होण्याचं स्वप्न बघत असणाऱ्या रिंकू सिंगवर घरची जबाबदारी कमी वयात पडली.


रिंकू सिंगला परिस्थितीमुळे साफसफाई सारखं कामं करण्याची वेळ सुद्धा आली होती. अशी परिस्तिथी असताना सुद्धा रिंकूने हार नाही मानली त्याने परिस्तिथीवर मात केली आणि काम आणि क्रिकेट दोन्ही सांभाळणं म्हणजे दोन दगडावरची कालाकारी दाखवण्यापैक्षा कमी राहिलं नाही. मात्र, त्यानं क्रिकेट खेळणं काही सोडलं नाही.


आणखी वाचा - VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!


रिंकूला दिल्लीमधल्या एका स्थानिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. त्यामध्ये त्याला बक्षीस स्वरूपात बाईक भेट देण्यात आली होती. रिंकूला अभ्यासात विशेष काही करता आलं नाही आणि ती नववीत नापास देखील झाला होता. रिंकूच्या म्हणण्यानुसार, वडील त्याला क्रिकेट खेळण्यासाठी मारायचे. मात्र, जेव्हा त्याने वडिलांना बाईक दिली, त्यावेळी पोराचं वडिलांना कौतूक वाटतं. 



दरम्यान, रिंकूने (Rinku Singh Career) आत्तापर्यंत 40 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत आणि 7 शतके, 19 अर्धशतकांसह एकूण 2875 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 6 विकेट्सही घेतल्या आहेत. त्‍याने त्‍याच्‍या एकूण टी-20 करिअरमध्‍ये 78 सामन्‍यात 1392 धावा केल्या आहेत. रिंकू सिंगला बघून अनेक तरुणांना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळते, हे मात्र नक्की.